Share

पालखीस परवानगी नाकारली, महाराजांचा वारकर्‍यांसहित आत्मदहनाचा इशारा!

Published On: 

पैठण: संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीस परवानगी नाकारल्याने आपेगाव मंदिराचे अध्यक्ष हभप ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर यांनी वारकऱ्यांसहित मंदिरातच आत्मदहन करण्याचा इशारा प्रशासनास दिला आहे. गत दोन वर्षांपासून कोरोना संसर्गामुळे वारीची परंपरा खंडित झाली आहे. त्यामुळे यावर्षी शासनाने परवानगी दिली नाही तर समस्त वारकर्‍यांना घेऊन आपण मंदिरातच आत्मदहन करू अशी टोकाची भूमिका ज्ञानेश्वर महाराज यांनी पत्रकार परिषदेत घोषित केली. त्यांच्या या घोषणेनंतर वारकरी संप्रदायात मोठी खळबळ उडाली आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज यांची जन्मभूमी असलेल्या पैठण तालुक्यातील आपेगाव येथून पंढरपूर आषाढी वारी गेल्या ८४२ वर्षांपासून चालत आली आहे. मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ही परंपरा खंडित झाली. मात्र गेल्या वर्षी राज्य शासनाने मानाच्या दिंडी सहीत इतर दोन दिंड्यांना पंढरपूर वारीसाठी परवानगी दिली आहे. मात्र राज्य शासनाने संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्मस्थानाहून निघणाऱ्या पालखीस परवानगी नाकारली. यावर मंगळवारी आपेगाव येथे पत्रकार परिषदेत हभप ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर यांनी आपली भूमिका मांडली.

यावेळी ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, दोन वर्षांपासून माऊली दिंडी संदर्भात आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांच्यासह विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन पत्र व्यवहार केला. मात्र याबाबत आमची दखल घेतलेली नाही. त्यामुळे आता वारकऱ्यांसह आत्मदहन करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. आमच्यासोबत १८ जिल्ह्यातील वारकरी आत्मदहनाचा मार्ग स्वीकारणार आहेत. १२ जुलै रोजी आपेगाव येथे संत ज्ञानेश्‍वर महाराज मंदिरात वारकऱ्यांसहित आत्मदहन करू असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!