औरंगाबाद : शहरातील वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेने यंदा शहर परिसरात तब्बल एक लाख ३५ हजार ६४३ झाडे लावण्याचा निर्णय घेतला आहे. खाम नदीचे पुनरुज्जीवन केले जात असून, त्याअंतर्गत नदीपात्रातच एक लाख झाडे लावण्याचा संकल्प प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी केला आहे. त्यासोबतच शहरातील खुल्या जागा, रस्त्यांच्या दुतर्फा, कचरा प्रक्रिया प्रकल्पांच्या परिसरात देशी पद्धतीच्या झाडांची डेन्स फॉरेस्ट पद्धतीने लागवड केली जाणार असल्याचे उद्यान अधीक्षक विजय पाटील यांनी सांगितले.
शहराच्या प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी वृक्ष लागवडीवर जोर देण्यात आला आहे. महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी गेल्या वर्षभरात शहरातील खुल्या जागा, ग्रीन बेल्टमध्ये जास्तीत जास्त झाडे लावण्याचा धडाका लावला आहे. यंदा तब्बल एक लाख ३५ हजार ६४३ झाडे लावण्याची तयारी उद्यान विभागाने केली आहे.
यासंदर्भात पाटील यांनी सांगितले की, खाम नदीपात्रात सर्वाधिक एक लाख झाडे लावली जातील. त्यासोबत शहरात मोठ्या प्रमाणात खुल्या जागा आहेत. त्यापैकी ४० जागांवर झाडे लावली जाणार आहेत. महापालिकेने गतवर्षी शहर परिसरात ८९ हजार झाडे लावली होती. तसेच २०१९ मध्ये ३५ हजार झाडे लावली होती. यंदा सर्वाधिक एक लाख ३५ हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट पूर्ण केले जाणार आहे. खाम नदीपात्रात झाडे लावण्याचा उपक्रम सुरू झाला आहे. पण गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खंड पडला आहे. मोठा पाऊस होताच झाडे लावली जातील, असे पाटील यांनी सांगितले.
असे असेल उद्दिष्ट
उद्याने ९४ ४८०५
रस्ते १८ ३४८०
खुल्या जागा ४० २२३५८
कचरा प्रक्रिया प्रकल्प ०३ ५०००
खाम नदी १०००००
महत्त्वाच्या बातम्या
- चूक मान्य करण्याची नैतिकता, इच्छाशक्ती भाजपकडे नाही-अशोक चव्हाण
- औरंगाबादेतील निर्बंध शिथिल करा, नसता आंदोलन करण्याचा आम आदमी पक्षाचा इशारा!
- ‘मी पुन्हा येईन’साठी किती रडीचा डाव खेळणार? रोहिणी खडसेंची फडणवीसांवर खोचक टीका
- ‘कालचा प्रकार पाहून मी अवाक् झालो, शरमेने मान खाली गेली’
- कोरोनाची लाट ओसरताच देशातील अर्थव्यवस्था पुन्हा येऊ लागली पूर्वपदावर

