औंरगाबाद : राज्याच्या दोन दिवसाच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने भाजपच्या ११ आमदारांचे निलंबन केले. दोन दिवसाच्या अधिवेशनात पहिल्याच दिवशी ११ आमदारांचे निलंबन झाल्याने भाजपच्या वतीने या विरोधात राज्यभर आंदोलन करण्यात आले. औरंगाबाद जिल्ह्यात भाजपच्या शहर आणि ग्रामीण पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.
यामध्ये भाजपच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ठाकरे सरकारला मराठा आणि ओबीसी समाजाला आरक्षण द्यायचे नाही. त्यामुळेच भाजपच्या आमदारांवर खोटे आरोप लावून त्यांचे निलंबन करण्यात आलं असल्याचा आरोपही या वेळी आंदोलनकर्त्यांनी केला आहे. भाजप ओबीसी आणि मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत शांत बसणार नाही. त्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरणार असल्याचा इशाराही या वेळी देण्यात आला.
भाजपच्या आंदोलनाला औरंगाबाद ग्रामीण आणि महिला मोर्चाच्या पदाधिकारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी ठाकरे सरकार आणि शरद पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच भाजपच्या आमदारांचे निलंबन मागे घेण्याची मागणीही करण्यात आली. या वेळी माजी महापौर बापू घडामोडे, माजी उपमहापौर विजय औताडे, फुलंब्रीचे नगाराध्यक्ष सुहास शिरसाठ यांची प्रमुख उपस्थिती होती.
महत्त्वाच्या बातम्या
- चूक मान्य करण्याची नैतिकता, इच्छाशक्ती भाजपकडे नाही-अशोक चव्हाण
- औरंगाबादेतील निर्बंध शिथिल करा, नसता आंदोलन करण्याचा आम आदमी पक्षाचा इशारा!
- ‘मी पुन्हा येईन’साठी किती रडीचा डाव खेळणार? रोहिणी खडसेंची फडणवीसांवर खोचक टीका
- ‘कालचा प्रकार पाहून मी अवाक् झालो, शरमेने मान खाली गेली’
- कोरोनाची लाट ओसरताच देशातील अर्थव्यवस्था पुन्हा येऊ लागली पूर्वपदावर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

