🕒 1 min read
औरंगाबाद : कोरोनाच्या पहिल्या लाटेत औरंगाबाद जिल्हयात एकूण ४३,७०० बाधित आढळून आले होते. मात्र दुसर्या लाटेत मार्च ते जून या चार महिन्यांत जिल्ह्यात तब्बल १ लाख २ हजार ५०८ नागरिक कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याचे समोर आले आहे. प्राप्त अहवालानुसार पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसर्या लाटेत बाधितांचे प्रमाण दुपटीपेक्षाही अधिक दिसून आले. आता तिसर्या लाटेत डेल्टा प्लस या नवीन म्युटेशनचा अधिक संसर्ग परसण्याची शक्यता आरोग्य तज्ज्ञांनी वर्तवली आहे. त्यामुळे तिसरी लाट आलीच तर यात जिल्ह्यातील बाधितांची संख्या तीन लाखांच्यावर जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
साधारणतः फेब्रुवारीच्या तिसर्या आठवड्यापासून औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे मानले जाते. मात्र खर्या अर्थाने मार्च महिन्यापासून या लाटेने उग्र रुप धारण केले. त्यावेळी रोजचे हजारपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत असल्याने बेड्सची भीषण समस्या निर्माण झाली होती. घाटी, जिल्हा सामान्य रुग्णालय, मेल्ट्रॉन कोविड सेंटरसह शहरातील खासगी रुग्णालये देखील कोरोना रुग्णांनी हाऊसफुल झाली होती. दरम्यानच्या काळात महापालिका व जिल्हा प्रशासनाने प्रभावी उपाययोजना राबविल्या. परिणामी, मे महिन्यापासून काही प्रमाणात रुग्णांची संख्या घटण्यास सुरूवात झाली.
या काळात ग्रामीणच्या तुलनेत शहरातील रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट पहायला मिळाली. त्यानंतर जून महिन्यात कोरोनाचा संसर्ग ग्रामीण भागातही काही प्रमाणात कमी होण्यास सुरूवात झाली. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनाही दिलासा मिळाला. दरम्यान, प्राप्त अहवालानुसार पहिल्या आणि दुसर्या लाटेत ३० जूनपर्यंत जिल्ह्यात एकूण १ लाख ४६ हजार २०८ बाधित निघाले होते. त्यापैकी १ लाख ४२ हजार १३२ रुग्ण बरे होन घरी परतले. तर ३४२६ बाधितांचा मृत्यू झाला. तिसऱ्या लाटेत बाधितांची संख्या वाढणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मनपाने तयारी सुरु केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- चूक मान्य करण्याची नैतिकता, इच्छाशक्ती भाजपकडे नाही-अशोक चव्हाण
- औरंगाबादेतील निर्बंध शिथिल करा, नसता आंदोलन करण्याचा आम आदमी पक्षाचा इशारा!
- ‘मी पुन्हा येईन’साठी किती रडीचा डाव खेळणार? रोहिणी खडसेंची फडणवीसांवर खोचक टीका
- ‘कालचा प्रकार पाहून मी अवाक् झालो, शरमेने मान खाली गेली’
- कोरोनाची लाट ओसरताच देशातील अर्थव्यवस्था पुन्हा येऊ लागली पूर्वपदावर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
