मुंबई : दलित आदिवासी इतर मागासवर्गीयांचे पदोन्नतीमधील हक्काचे आरक्षण त्वरित देण्यात यावे, राज्यात वाढत असलेले दलित अत्याचार रोखावेत, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. मुस्लिम समाजाला शिक्षण आणि नोकरी मध्ये 5 टक्के आरक्षण द्यावे, ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण पूर्ववत करावेत तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेऊ नयेत यासह अनेक मागण्यांसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात आज आझाद मैदान येथे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने एल्गार पुकारत महाविकास आघाडी सरकार विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली.
यावेळी नाशिकमधील ओझर विमानतळाला कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी रामदास आठवले यांनी केली. नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि बा पाटील यांचे नाव देण्यास रिपाइं चा पाठिंबा आहे. असा पुनरुच्चार रामदास आठवले यांनी केला. या निदर्शनाचे आयोजन रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे केले.
त्यांनी गनिमिकाव्याने व्यहरचना करीत आझाद मैदानात रिपाइंचे शेकडो कार्यकर्ते उतरविले. या निदर्शनास येणाऱ्या रिपाइं कार्यकर्त्यांना अनेक भागात मुंबई पोलिसांनी अटकाव केला होता.त्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानात मोठ्या कौशल्याने रिपाइं चे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित राहिले.
राज्यात दलित अत्याचार वाढत आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील चोतोडा गावात हिवराळे परिवारावर झालेला हल्ला अत्यंत अमानुष होता या हल्ल्याचा तीव्र निषेध रामदास आठवले यांनी यावेळी केला. दलित अत्याचार झालेल्या गावात बुलडाणाचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी जाऊन चिथावणीखोर जातीवादी भूमिका घेतल्याबद्दल त्यांचा निषेध करीत संजय गायकवाड यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- स्मार्ट सिटीत ओतला पाण्यासारखा पैसा, पाहा स्मार्ट औरंगाबादचा बकाल चेहरा!
- औरंगाबादेतील निर्बंध शिथिल करा, नसता आंदोलन करण्याचा आम आदमी पक्षाचा इशारा!
- ‘मी पुन्हा येईन’साठी किती रडीचा डाव खेळणार? रोहिणी खडसेंची फडणवीसांवर खोचक टीका
- ‘कालचा प्रकार पाहून मी अवाक् झालो, शरमेने मान खाली गेली’
- कोरोनाची लाट ओसरताच देशातील अर्थव्यवस्था पुन्हा येऊ लागली पूर्वपदावर


