मुंबई : कालपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली होती. पावसाळी अधिवेशनाचे दोन्ही दिवस वादळी ठरले. काल भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन केल्यापासून भाजप आमदारांनी सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला होता. आज तर विधीमंडळाच्या आवारात भाजपने अभिरूप विधानसभा थाटत वेगळं कामकाज केलं. यावर देखील तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी आक्षेप घेत माईक व स्पीकर जप्त करण्यास सांगितले.
दरम्यान, भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या या कारवाई विरोधात राजभरात ठिकठिकाणी आंदोलन केलं. तर, कोल्हापुरात भाजपच्या कृत्याविरोधात शिवसेनेनं दसरा चौकात आंदोलन केलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच शिवसैनिकांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आलं. उठसूठ ठाकरे कुटुंबावर आरोप खपवून घेणार नाही, असं देखील यावेळी शिवसैनिकांनी भाजपला ठणकावून सांगितलं आहे.
‘उठसूठ ठाकरे कुटुंबावर आरोप खपवून घेणार नाही. काल जो विधान भवनात प्रकार घडला त्यामुळे सभागृहाचे पावित्र्य धोक्यात आले. सत्तेसाठी लाचार झालेल्या भाजपाचे हे कृत्य अत्यंत निषेधार्थ आहे, असं म्हणतानाच आज जर गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन असते तर त्यांनी या 12 आमदारांच्या थोबाडीत हाणली असती, असं शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय पवार हे पत्रकारांशी प्रतिक्रिया देताना बोलले.
महत्वाच्या बातम्या
- ‘आंदोलक शेतकरी आपले दुश्मन आहेत का? ते पाकिस्तानातून आलेत काय?’, भुजबळांचा केंद्राला सवाल
- ‘मी पुन्हा येईन’साठी किती रडीचा डाव खेळणार? रोहिणी खडसेंची फडणवीसांवर खोचक टीका
- ‘कालचा प्रकार पाहून मी अवाक् झालो, शरमेने मान खाली गेली’
- दलित,मुस्लिम,मराठा आणि ओबीसींच्या प्रश्नांवर रिपब्लिकन पक्षाचा आझाद मैदानात एल्गार
- ‘जे तीस वर्षात झालं नाही ते आता काय होणार ?’; भाजपच्या युतीबाबत उद्धव ठाकरेंच भाष्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

