🕒 1 min read
मुंबई : अहमद शहजाद पाकिस्तान क्रिकेट संघातून बराच काळ बाहेर आहे. शेवटच्या वेळी तो २०१९मध्ये लाहोरमध्ये श्रीलंकेविरुद्ध टी-२० सामना खेळला होता. त्यानंतर खराब फॉर्म आणि पाकिस्तानी निवडकर्त्यांचा युवा संघ तयार करण्याच्या विचारामुळे शहजादसाठी पाकिस्तान संघाचे दरवाजे उघडले नाहीत. मात्र, असे असूनही ते अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. अलीकडेच त्याने माजी वेगवान गोलंदाज वकार युनूसवर पाकिस्तान संघातून वगळल्याचा आरोप केला होता. आता शहजादने आणखी एका वक्तव्याने सर्वांचे लक्ष स्वतःकडे वेधले आहे. बॉलिवूड अभिनेता ब्रॅड पिटने त्याच्या बायोपिकमध्ये आपली भूमिका साकारावी अशी त्याची इच्छा आहे.
शहजादने पाकिस्तानी पत्रकार सय्यद हुसैनी यांना दिलेल्या मुलाखतीदरम्यान या इच्छेचा उल्लेख केला. हुसैनीने शहजादला विचारले की, तुमच्या मते कोणता अभिनेता अहमद शहजादची भूमिका चांगल्या प्रकारे साकारू शकतो. यावर हा पाकिस्तानी फलंदाज मोठ्याने म्हणाला, ब्रॅड पिट. हे ऐकून पत्रकार हुसैनीही जोरजोरात हसू लागले.
Test cricketer @iamAhmadshahzad wants Hollywood star @PittOfficial to play him in his biopic. pic.twitter.com/8nhvN0qp0i
— Syed Yahya Hussaini (@SYahyaHussaini) July 7, 2022
शहजादने एप्रिल २००९ मध्ये दुबईत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. एका महिन्यानंतर, त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० पदार्पणही केले. ४ वर्षांनंतर श्रीलंकेविरुद्ध पहिली कसोटी खेळली. शहजादने पाकिस्तानसाठी १३ कसोटीत ९८२ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने तीन शतके आणि चार अर्धशतके झळकावली आहेत. त्याने ८१ एकदिवसीय सामन्यांमध्ये २६०५ धावा आणि ५९ टी-२० मध्ये १४७१ धावा केल्या आहेत. शहजादने वनडेत ६ शतके झळकावली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
