Share

भारताच्या ‘लिटल मास्टर’चा आज ७०वा बर्थडे; ICCनं शेअर केला खास VIDEO!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचे ‘लिटल मास्टर’, माजी सलामीवीर सुनील गावसकर आज ७३वा वाढदिवस साजरा करत आहेत. यानिमित्ताने अनेक माजी क्रिकेटपटूंनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचवेळी आयसीसीने गावसकर यांच्या वाढदिवसानिमित्त एक खास व्हिडिओ शेअर केला आहे.

या आयसीसी व्हिडिओमध्ये क्रिकेटमधील दिग्गज व्यक्तींनी गावसकरांचे खूप कौतुक केले आणि ते इतके खास फलंदाज का आहेत हे सांगितले. इंग्लंडचे माजी अष्टपैलू खेळाडू इयान बोथम यांनी त्यांच्या कौतुकात मोठी गोष्ट सांगितली. ते म्हणाले, ”सुनील गावसकर असा सलामीवीर होता ज्याला तुम्हाला लवकरात लवकर पॅव्हेलियनमध्ये पाहायचे होते. कारण तो मुक्कामाला असायचा तर त्याने दुपारचे जेवण, रात्रीचा मुक्काम बुक केला असता. त्याला आऊट करणे खूप अवघड होते.”

सुनील गावसकर यांच्या नावावर अनेक मोठे विक्रम आहेत. त्यांनी १९७८/७९ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या ६ सामन्यांच्या कसोटी मालिकेत ७३२ धावा केल्या होत्या. जो कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आहे. गावसकर यांनी त्या मालिकेत ४ शतके आणि १ अर्धशतक झळकावले होते. याशिवाय १९८१/८२ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत गावसकर यांनी ६ सामन्यांच्या ९ डावात ५०० धावा केल्या होत्या. गावसकर हे कसोटी क्रिकेटमध्ये १०,००० धावा करणारे पहिले फलंदाज होते आणि दीर्घकाळापर्यंत सर्वाधिक शतकांचा विक्रमही त्यांच्या नावावर होता.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!