🕒 1 min read
मुंबई : पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमची बॅट सध्या पेटलेली आहे. बाबर आझम एकापाठोपाठ एक रेकॉर्ड बनवत आहे. पाकिस्तानमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली गेली. ज्यामध्ये बाबरच्या बॅटने बॅक टू बॅक दोन शतके झळकावली होती. आता बाबर आझमने एकदिवसीय कारकिर्दीत मोठा विक्रम केला. तो एकदिवसीय कारकिर्दीतील सर्वात जलद १६ शतके झळकावणारा खेळाडू ठरला आहे. त्याने या बाबतीत दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज हाशिम आमला आणि भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीलाही मागे टाकले आहे.
पाकिस्तान संघाचा धडाकेबाज फलंदाज बाबर आझमने (babar azam) ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय कारकिर्दीतील १६ वे शतक झळकावले. या मालिकेत बाबर आझमला मालिकावीराचा किताबही मिळाला होता. बाबरने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीत महान विश्वविक्रम केला आहे.सर्वात कमी डावात सर्वात जलद १६ शतके करणारा बाबर आझम पहिला खेळाडू ठरला आहे. बाबरने १६ शतके झळकावण्यासाठी केवळ ८४ डाव घेतले. यापूर्वी हा विक्रम दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर हाशिम अमलाच्या (hashim amla) नावावर होता. त्याने ९४ डावात हा पराक्रम केला. याच भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने (virat kohli) ११० डाव खेळून १६ शतके झळकावली होती.
बाबर आझम ज्या प्रकारे फलंदाजी करताना नवनवे विक्रम करत आहे. त्याला पाहून तो पाकिस्तानच्या क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोच्च विक्रमाची नोंद करेल असे दिसते. कारण त्याने ८४ डावात ही कामगिरी केली आहे. यापूर्वी, शहीद अन्वरने २० शतके करण्यासाठी २४४ डाव खेळले होते. तसेच १५ शतके झळकावणाऱ्या मोहम्मद युसूफने 267 डाव खेळले. हे सगळे बाबर पेक्षा जास्त सामने खेळले ज्यामुळे सध्यातरी बाबर पाकिस्तानच्या क्रिकेट इतिहासात सर्वात अव्वल स्थानी आहे.
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
महत्वाच्या बातम्या
- “…त्या पक्षात जातीवाद असूच शकत नाही”, राजे ठाकरेंच्या टीकेवर रुपाली पाटलांचे प्रत्युत्तर
- बाहुबली’ फेम राणा दग्गुबातीच्या चाहत्यांना आनंदाची बातमी! लवकरचं होणार बाबा
- राज ठाकरेंच्या कालच्या भाषणातून बाळासाहेबांची आठवण झाली – चंद्रकांत पाटील
- Women’s World Cup Final : अजिंक्य ऑस्ट्रेलिया..! इंग्लंडला धूळ चारत कागांरूंची विक्रमी जगज्जेतेपदावर मोहोर
- “…हे भूमिपूजन एक नौटंकी”, ठाकरे सरकारवर निलेश राणेंचा हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
