🕒 1 min read
मुंबई : बाहुबली’ फेम राणा दग्गुबाती हा सोशलमीडिया सतत सक्रिय असतो. राणा डग्गुबतीच्या घरी लवकरच एका नवीन पाहुण्याच आगमन होणार असल्याची चर्चा होत आहे. मागच्या काही दिवसांपासून त्याची बायको मिहिका प्रेग्नन्ट असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू होती. त्यावर आता मिहिकानं स्पष्टीकरण दिले आहे. मिहिका बजाजची ही प्रतिक्रिया सध्या सगळीकडे चर्चेत आहे.
काही दिवसांपूर्वीच मिहिकानं तिच्या इन्स्टाग्रामवर पती राणा डग्गुबतीसोबत एक फोटो शेअर केला होता. दोघांनी कुणाच्या तरी लग्नाला हजेरी लावली होती आणि त्या लग्नातील हा या दोघांचा फोटो सोशल मीडियावर चर्चेत आला होता. या फोटोमध्ये मिहिकाचं वाढलेलं वजन पाहून अनेकांनी ती प्रेग्नन्ट असल्याचं म्हटलं होतं. राणा डग्गुबती लवकरच बाबा होणार अशा चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्या होत्या. यावर आता मिहिकानं प्रतिक्रिया दिली आहे.
मिहिकाच्या या फोटोवर अनेकांनी कमेंट करत तिच्या प्रेग्नन्सीबद्दल विचारणा केली होती. यावर उत्तर देताना मिहिकानं प्रेग्नन्सीचं सत्य उघड केलं आहे. एका युजरच्या प्रश्नाचं उत्तर देताना ती म्हणाली, ‘नाही मी प्रेग्नन्ट नाहीये. फक्त लग्नानंतर माझं वजन काहीसं वाढलं आहे.’ मिहिकाच्या या उत्तरावरून समजून येतं की या दोघांनीही अद्याप कोणतंही फॅमिली प्लानिंग केलेलं नाही.
महत्वाच्या बातम्या :
Women’s World Cup Final : अजिंक्य ऑस्ट्रेलिया..! इंग्लंडला धूळ चारत कागांरूंची विक्रमी जगज्जेतेपदावर मोहोर
“…हे भूमिपूजन एक नौटंकी”, ठाकरे सरकारवर निलेश राणेंचा हल्लाबोल
IPL 2O22 सुरू असताना भारताच्या माजी क्रिकेटरला झाला कोरोना; शास्त्री, रैना चिंतेत!
PAK vs AUS: काय सांगता! पाकिस्तानने २० वर्षांनी जिंकली मालिका, बाबर- इमामने कांगारूंना धुतले
IPL 2022 CSK vs PBKS : आयपीएलचे ‘किंग्ज’ आज भिडणार; ‘असे’ असू शकतात दोन्ही संघ!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
