🕒 1 min read
मुंबई: ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील ICC महिला क्रिकेट विश्वचषक, 2022 स्पर्धेचा अंतिम सामना हॅगली ओव्हल, क्राइस्टचर्च, न्यूझीलंड येथे खेळवला जात आहे. गतविजेत्या इंग्लंडने नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले. फलंदाजीला उतरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने ५० ओव्हरमध्ये बलाढ्य ३५६ धावा केल्या. ज्यात एलिसा हिलीने (alyysa healy) १३८ चेंडूत विक्रमी १७० धावा केल्या. ज्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ ढासळताना दिसला आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने ७१ धावांनी सामना जिंकत ७व्यांदा वर्ल्डकप आपल्या नावे केला आहे.
आयसीसी महिला विश्वचषक फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्याचा निर्णय इंग्लंडला उलट पडला. प्रत्युत्तरात सलामीवीर लवकर गमावल्यामुळे इंग्लंडची सुरुवात डळमळीत झाली. त्यानंतर हीदर नाइटने (heather knight) नताली स्कायव्हरसह (natalie sciver) तिसर्या विकेटसाठी महत्त्वपूर्ण भागीदारी केली. यावेळी नतालीने इंग्लंडकडून १०३ चेंडूत शतक झळकवले. मात्र तिचे शतक इंग्लडच्या कामी आले नाही. इंग्लडची खेळी २८५ धावांवर संपुष्टात आली.
ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी यावेळी अप्रतिम कामगिरी केली. त्यांच्याकडून अलाना किंगने आणि जेसा जॉन्सनने ३ विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाला विजयाच्या आणखी एक पाऊल जवळ आणले. ६ वेळा चॅम्पियन राहिलेल्या ऑस्ट्रेलियाने गतविजेत्या इंग्लडला पराभूत करत पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. तब्ब्ल नऊ वर्षांनी ऑस्ट्रेलिया महिला संघाने ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे.
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
महतावाच्या बातम्या
- PAK vs AUS: काय सांगता! पाकिस्तानने २० वर्षांनी जिंकली मालिका, बाबर- इमामने कांगारूंना धुतले
- IPL 2022 CSK vs PBKS : आयपीएलचे ‘किंग्ज’ आज भिडणार; ‘असे’ असू शकतात दोन्ही संघ!
- IPL 2022 : हार्दिकच्या गुजरातसेनेची गाडी सुसाट; सलग दुसऱ्या विजयानंतर पंड्या म्हणतो…
- Women’s World Cup Final : बाब्बो..! एलिसा हिलीनं रचला वर्ल्ड रेकॉर्ड; पहिल्यांदाच घडलीय ‘अशी’ गोष्ट!
- बॉलिवूड रॅपर बादशाह झालाय ‘या’ आजारचा शिकार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
