नवी दिल्ली : सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून ओळखला जाणारा ऑस्कर पुरस्कार सोहळा धामधुमीत पार पडला. या पुरस्काराचे ९४ वे वर्ष आहे. यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात वॉर्नर ब्रदर्स निर्मित ‘डयून’ चित्रपटाने सर्वाधिक ६ पुरस्कार मिळवले. ऑस्कर पुरस्कार सोहळ्याच सर्वोत्कृष्ट माहितीपट द समर ऑफ सोलने ठरला. तसेच या श्रेणीत ‘रायटिंग विथ फायर’ या भारतीय माहितीपटाला नामांकन मिळाले होते. परंतु या चित्रपटाला पुरस्कार मिळवण्यात अपयश आले.
किंग रिचर्ड या चित्रपटासाठी अभिनेता विल स्मिथला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार स्वीकारताना स्मिथ भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. तर ‘The Eyes of Tammy Faye’ या चित्रपटासाठी जेसिका चेस्टेन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार देण्यात आला. तसेच ‘कोडा’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर मिळाला आहे.
वॉर्नर ब्रदर्स निर्मित ‘डयून’ चित्रपटानं सहा पुरस्कार जिंकले आहेत. ‘सर्वोत्कृष्ट फिल्म एडिटिंग’, ‘सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्कोर’, ‘सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिजाइन’, ‘सर्वोत्कृष्ट साउंड’, ‘सर्वोत्कृष्ट विजुअल इफेक्ट’, ‘सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी’ असे एकूण सहा पुरस्कार जिंकले आहेत. तर ट्रॉय कोत्सुर यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. ५३ वर्षीय ट्रॉय यांचा हा पहिला ऑस्कर असून पुरस्कार स्विकारतेवेळी ते भावूक झाले.
चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणून ऑस्कर ओळखला जातो. ९४ व्या ऑस्कर पुरस्कारासाठी हॉलिवूड अभिनेता बेनेडिक्ट कंबरबॅचची मुख्य भूमिका असलेल्या ‘द पॉवर ऑफ डॉग’ या चित्रपटाला सर्वाधिक १२ नामांकने मिळाली होती.
महत्वाच्या बातम्या :


