पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते वाघळवाडी येथील राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान अर्थसहाय्यीत मु. सा. काकडे महाविद्यालय नूतन इमारत व सभागृहाच्या उद्धाटनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलत असतांना उद्याची सुसंस्कृत आणि सक्षम पिढी निर्माण करण्यासाठी सर्वसमावेशक असे शिक्षण द्यावे, असे आवाहन पवारांनी केले.
यावेळी बोलत असतांना अजित पवार म्हणाले की,‘आनंदाचा निर्देशांक कसा वाढेल यादृष्टीने सर्वांनी प्रयत्न करायला हवे. उद्याची चांगली पिढी निर्माण करण्यासाठी सर्वसमावेशक असं शिक्षण दिलं पाहिजे. विद्यार्थ्यांनी क्रीडाक्षेत्रात नैपुण्य मिळवावं,आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावं यासाठी शिक्षकानी विद्यार्थ्यांना प्रवृत्त करणं आवश्यक आहे.त्यामुळे ते जीवनात यश संपादन करू शकतील.विद्यार्थ्यांनी कौशल्य विकासाचं शिक्षण घेऊन व्यवसाय सुरू करावा जेणेकरून इतरांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो, असेही ते म्हणाले.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की, ‘मु. सा. काकडे महाविद्यालयाला ५० वर्षांची कारकीर्द आहे. १५ एकरमध्ये वसलेला महाविद्यालयाचा परिसर खूपच सुंदर असून संस्थेचे पदाधिकारी, अधिकारी व शिक्षक वर्ग खूप चांगल्या प्रकारे काम करून चांगले विद्यार्थी घडवत आहेत, याचे समाधान आहे’, असेही अजित पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- “…आधीच विरोधी पक्षनेत्यांचे ‘पंटर्स’ या कार्यक्रमात गोंधळ घालतात”, अहिल्यादेवी होळकर स्मारक वादावरून राऊतांची टीका
- “देवेंद्र फडणवीस जेवढी स्क्रिप्ट देतात…”; राष्ट्रवादीचा गोपीचंद पडळकरांवर आरोप
- “जनतेला कळतंय कोणाचं सरकार…”, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून भातखळकरांची टीका
- ‘या’ तारखेला होणार पंतप्रधान मोदींचा ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रम
- भाजपच्या असंख्य भ्रष्टाचारांबाबत हाच हातोडा शांत का?- संजय राऊत


