Share

“आज देशात जे चित्र दिसत आहे, ते जर असंच राहिलं तर…”, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता

Published On: 

🕒 1 min read

हडपसर: माजी आमदार जगन्नाथबापू शेवाळे यांचा अमृत महोत्सवी अभीष्टचिंतन सोहळा साजरा करण्यात आला. जगन्नाथबापू शेवाळे यांनी उभं आयुष्य माणसं जोडण्याचं काम केलं. माणसं कधी तोडली नाहीत. ती बरोबर घेऊन चालत राहिले. असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांनी म्हटले. ते हडपसर येथे कार्यक्रमात उपस्थित होते.

दरम्यान यावेळी शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे केंद्र सरकारवर निशाणा साधला. “आज देशात जे चित्र दिसत आहे, ते जर असंच राहिलं तर मला काळजी वाटते की देशात ऐक्य व सलोख्याचा प्रश्न उद्भवून त्याला स्फोटक रूप प्राप्त होऊ शकते. काही वाटेल ते झाले तरी चालेल पण ती स्थिती येऊ द्यायची नाही. आपला देश व राज्य एकसंघ ठेवण्यासाठी आपल्याला काम करावे लागेल.”, असे शरद पवार यांनी म्हटले.

तसेच आपण सारे बहुतांश शेतकरी कुटुंबातील आहोत. घरातील एकाने तरी शेतीशी नाळ जोडून ठेवली पाहिजे. पण या भागाचा अभ्यास केला तर ही नाळ येत्या काळात राहील की नाही याची काळजी मला वाटते. लोक अन्य क्षेत्रात जात असतील तर त्याबद्दल माझी तक्रार नाही, पण घरातील एकाने तरी शेती जपली पाहिजे.अशी इच्छाही शरद पवार यांनी व्यक्त करून दाखवली.

महत्वाच्या बातम्या:

“सुसंस्कृत आणि सक्षम पिढी निर्माण करण्यासाठी…”, अजित पवारांचे मोठे वक्तव्य

नाणार प्रकल्प पुनरुज्जीवनाच्या चर्चेवर संजय राऊतांचे स्पष्टीकरण; म्हणाले…

‘या’ तारखेला होणार पंतप्रधान मोदींचा ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रम

“देवेंद्र फडणवीस जेवढी स्क्रिप्ट देतात…”; राष्ट्रवादीचा गोपीचंद पडळकरांवर आरोप

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!