Share

“जाधवांनी पोच पावती, बिलं ही घेतले असेल?”, ‘त्या’ कारवाईवरून किरीट सोमय्यांची टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेना नेते यशवंत जाधव (Yashwant Jadhav), त्यांचे सहकारी आणि बीएमसी कंत्राटदार यांच्या निवासस्थानी २५ फेब्रुवारी रोजी आयकर विभागाला काही महत्त्वाचे पुरावे मिळाले होते. तपासात जाधव यांनी केलेल्या कोट्यवधींच्या संशयास्पद नोंदी असलेली डायरीही विभागाला सापडली आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, डायरीतील एका नोंदीमध्ये मातोश्रीला ५० लाख रुपयांचे घड्याळ पाठवल्याचा उल्लेख आहे आणि दुसऱ्या नोंदीमध्ये गुढीपाडव्याला मातोश्रीला २ कोटी रुपयांची भेट पाठवल्याचा उल्लेख आहे. दरम्यान, या मुद्द्यावरून आता भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

यासंदर्भात किरीट सोमय्या यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘हद्द कर दी. यशवंत जाधव यांनी घोटाळा लपविण्यासाठी, वांद्रा मातोश्री ला वाचविण्यासाठी स्वतःच्या “आई” चे नाव द्यावे…. वाईट वाटते. तसेच ५० लाखाचे घड्याळ, २ कोटी रोख जाधवांनी पोच पावती, बिल ही घेतले असेल?’, असा खोचक सवालही सोमय्यांनी केला आहे.

दरम्यान, यशवंत जाधव यांनी बीएमसीच्या ३० कोटी रुपयांच्या विविध कंत्राटांसाठी बिमल अग्रवाल यांची मर्जी राखल्याचा संशय आहे. जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव या मुंबईतील भायखळ्याच्या आमदार असून त्यांनी २०१९ मध्ये प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. कोलकाता येथील प्रधान डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीकडून झालेल्या व्यवहाराची माहिती प्राप्तिकर विभागाला या शपथपत्रातून मिळाली होती. जाधव आणि कुटुंबीयांनी भायखळा येथील इमारत खरेदीसाठी सुमारे १५ कोटी रुपये कंपनीने दिले होते. जाधव कुटुंबीयांनी नंतर हे पैसे कंपनीला परत केले, जे नंतर कंपनीने न्यूजहॉक मल्टीमीडिया प्रायव्हेट लिमिटेडकडे हस्तांतरित केले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!