🕒 1 min read
नवी दिल्ली: नाणार येथील तेलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत लाखो कोटी रुपयांचे आणि रोजगाराचे योगदान देण्याची क्षमता असून गेली काही वर्षे विरोधामुळे तो प्रकल्प रखडला. मात्र आता महाराष्ट्र सरकारचे मनपरिवर्तन होत असल्याचे केंद्रीय शिक्षण व कौशल्य विकासमंत्री धर्मेद्र प्रधान (Union Minister for Education and Skill Development Dharmendra Pradhan) यांनी म्हटले. यावरच शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“स्थानिकांचं मतपरिवर्तन झाल्याची माहिती माझ्याकडे नाही. हेमंत प्रधान आता त्या खात्याचे मंत्री नसून ते देशाचे शिक्षणमंत्री आहेत. त्यांनी शिक्षणावर अधिक बोललं पाहिजे. मी त्यांना ओळखतो, ते फार हुशार मंत्री आहेत. त्यांनी त्यांच्या काळात मतपरिवर्तनाचा प्रयत्न केला. पण तो होऊ शकला नाही.”, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ते आज माध्यमांशी संवाद साधत होते.
दरम्यान संयुक्त अरब अमिरात आणि सौदी अरेबिया यांच्या सहकार्याने कोकणच्या किनारपट्टीवर ६० लाख टन क्षमतेचा नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचे नियोजन होते, मात्र दुर्दैवाने त्याला विरोध झाला. त्यात बहुमूल्य वेळ वाया गेला आहे. पण आता ठाकरे सरकारचे मतपरिवर्तन होत असल्याचे संकेत मिळत आहेत. ‘देर आए लेकिन दुरुस्त आए’ या न्यायाने सरकारच्या मतपरिवर्तनाचे स्वागतच केले पाहिजे, असे धर्मेद्र प्रधान यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
‘या’ तारखेला होणार पंतप्रधान मोदींचा ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रम
“जनतेला कळतंय कोणाचं सरकार…”, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून भातखळकरांची टीका
“देवेंद्र फडणवीस जेवढी स्क्रिप्ट देतात…”; राष्ट्रवादीचा गोपीचंद पडळकरांवर आरोप
भाजपच्या असंख्य भ्रष्टाचारांबाबत हाच हातोडा शांत का?- संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
