🕒 1 min read
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा ‘परीक्षा पे चर्चा’ २०२२ हा कार्यक्रम शुक्रवारी १ एप्रिलला होणार आहे. यबाबत त्यांनी एक व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली आहे. दरम्यान मोदींनी २६ डिसेंबरच्या ‘मन की बात’ मधून देशाला संबोधित करत २०२२ मध्ये विद्यार्थ्यांशी परीक्षा पे चर्चा या अंतर्गत संवाद साधणार असल्याचे जाहीर केले होते.
नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रम पाहा, असे आवाहन केले आहे. कोरोना संसर्गामुळे गेल्या वर्षी हा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने झाला होता. या वर्षी ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. हा कार्यक्रम दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये आयोजित करण्यात येणार आहे.
‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात ९ वी ते १२ मध्ये शिकणारे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात.१६ फेब्रुवारी २०१८ ला परीक्षा पे चर्चामधील पहिला कार्यक्रम पार पडला होता. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी बोर्ड परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांवर मानसिक तणाव येऊ नये म्हणून मोदी त्यांना टीप्स देतात.
महत्वाच्या बातम्या:
“देवेंद्र फडणवीस जेवढी स्क्रिप्ट देतात…”; राष्ट्रवादीचा गोपीचंद पडळकरांवर आरोप
भाजपच्या असंख्य भ्रष्टाचारांबाबत हाच हातोडा शांत का?- संजय राऊत
“…तेव्हा महाराष्ट्र चुलीत गेलेला चालतो काय?”, राऊतांचा फडणवीसांना सवाल
“…तरी त्यांचा मेंदू ठिकाणावर येणार नाही”,संजय राऊतांचा किरीट सोमय्यांना जोरदार टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
