मुंबई : काल उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व शिवसेना जिल्हा प्रमुखांची बैठक घेतली. हिंमत असेल तर मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवा, असं आव्हानही उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. याआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राज्यात मध्यवधी निवडणुका लागतील, असं म्हंटल होत. पवारांच्या या वक्तव्यानंतर आता संजय राऊत यांनी देखील राज्यात विधानसभेसाठी मध्यवधी निवडणुका लागतील असं म्हटलंय. या तिन्ही बड्या नेत्यांच्या वक्तव्यानंतर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले कि, सध्याची एकूणच राजकीय परिस्थिती पाहता मध्यावधी निवडणुका लागणार आहेत असा दावा त्यांनी केला. त्याचबरोबर विरोधकांनी मध्यावधी निवडणुकीला तयार रहावे असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. गेल्या अडीच वर्षातील शिवसेनेचे काम जनतेला माहिती आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत आम्ही जिंकण्यासाठी पूर्ण तयारी करणार आहोत असं त्यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, काल विधानसभेत गैरहजर राहिल्याबाबत आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. काल विधानसभेत झालेलं मुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकलं नाही, आणि मला त्यांचे भाषण ऐकण्याची गरज नाही, मी फक्त शिवसैनिकांचे आवाज ऐकतो आणि शिवसैनिकांचे आवाज उद्धव ठाकरे यांंच्यामागे खंबीरपणे उभे असतात असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. तसेच १४ आमदारांच्या निलंबनाच्या यादीतून आदित्य ठाकरे यांचं नाव वगळण्यात आलं असून कुणाच्याही खास प्रेमाची मला गरज नाही असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

