मुंबई : फराह खान कायम कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. फराह खानने आजपर्यंत अनेक मोठ्या चित्रपटांसाठी कोरिओग्राफी केली आहे. दिग्दर्शक म्हणून देखील फराह खानला बॉलिवूडमध्ये ओळखलं जात. फराह खान तिच्या दिलखुलास अंदाजसाठी ओळखली जाते. नुकतंच फराहने तिच्या खासगी आयुष्याबद्दल एक खुलासा केला आहे. यामुळे ती चर्चेत आली आहे.
मिका सिंगच्या ‘स्वयंवर: मिका दी वोहती’ या शोमध्ये फराहने उपस्थिती लावली होती. या शोमध्ये फराहने लग्नानंतर ती घर सोडून पळून जाणार होती असा धक्कादायक खुलासा केला आहे. २००४ सालामध्ये फराहने फिल्म एडिटर शिरिष कुंदेरसोबत लग्न केले. या शोमध्ये फराहनला स्पर्धकांनी बरेच प्रश्न विचारले तिने प्रश्नांची उत्तर देखील दिली. यावेळी फराहने लग्नानंतर तिला पळून जावसं वाटत होतं असा खुलासा केला.
https://www.instagram.com/p/CeIbgQFK-xd/?igshid=YmMyMTA2M2Y=
फराह खान म्हणाली, “ज्यावेळी तुम्हाला लग्नासाठी योग्य व्यक्ती मिळेल त्याचवेळी तुम्ही लग्न करा. मी माझ्या लग्नानंतर पहिल्याच वर्षी पळून जायचा विचार करत होते. कारण त्यावेळी मला या सर्व गोष्टी सांभाळन खूप कठीण झालं होतं”.
महत्वाच्या बातम्या :


