Share

Aditya Thackeray : मी मुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकत नाही, फक्त शिवसैनिकांचे आवाज ऐकतो – आदित्य ठाकरे

Published On: 

मुंबई : काल बहुमत चाचणीत भाजप-शिंदे गटाला १६४ मतं मिळाली. तर दुरीकडे महाविकास आघाडीला ९९ मतं मिळाली. यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विजयाची घोषणा केली. भाजपा आणि शिंदे गटाला बहुमत मिळाल्यानंतर अनेक नेत्यांनी सभागृहात अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. यानंतर सभागृहात बोलताना स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील अनेक मुद्दे उपस्थित केलं. मात्र मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे हे गैरहजर होते. यावरून आता राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क सुरु झाले आहेत.

यावर आता आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काल विधानसभेत झालेलं मुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकलं नाही, आणि मला त्यांचे भाषण ऐकण्याची गरज नाही, मी फक्त शिवसैनिकांचे आवाज ऐकतो आणि शिवसैनिकांचे आवाज उद्धव ठाकरे यांंच्यामागे खंबीरपणे उभे असतात असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. तसेच १४ आमदारांच्या निलंबनाच्या यादीतून आदित्य ठाकरे यांचं नाव वगळण्यात आलं असून कुणाच्याही खास प्रेमाची मला गरज नाही असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

दरम्यान, मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी काढलेल्या व्हीपचे उल्लंघन केल्याप्रकरणी महाविकास आघाडीतील शिवसेनेच्या १४ आमदारांच्या निलंबनाची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे. यानुसार या १४ आमदारांना निलंबनाची नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आदर असल्याने त्यांनी आदित्य ठाकरे यांना अपत्रतेची नोटीस बजावली नाही. याबाबत बोलताना भरत गोगावले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच आता आदित्य ठाकरे यांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेतील, असं सांगितलं होत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!