Share

“ज्या दिवशी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, माझ्याकडून मर्सिडिज गाडी बक्षीस…” ; नितेश राणेंची मोठी घोषणा

Published On: 

पुणे :  भोसरी विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. या बैलगाडा शर्यतीच्या विजेत्यांवर बक्षिसांची खैरात करण्यात आली. यामध्ये जेसीबी, बोलेरो, ट्रॅक्टर, बुलेट आणि इतरही दुचाकींचा समावेश होता. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही बैलगाडा शर्यत पार पडली. याच वेळी भाजप नेते व आमदार नितेश राणे यांनी ट्विट करून एक मोठी घोषणा केली आहे.

नितेश राणे यांनी एक मोठी घोषणा केली पण त्यासाठी एक विशिष्ट अट ही त्यांनी ठेवली आहे. “ज्या वर्षी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील, त्या वर्षी महेश लांडगे यांच्या मार्फत भरवण्यात येण्याऱ्या बैलगाडा शर्यतीच्या घाटाच्या राजाला, म्हणजेच फायनल सम्राटाला माझ्याकडून मर्सिडिज गाडी बक्षीस म्हणून देण्यात येईल,” असे ट्विट करत नितेश राणे म्हणाले आहेत.

दरम्यान देशातील सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीसाठी अवघ्या तीन तासांत २ हजाराहून अधिक बैलगाडा मालकांनी टोकन नोंदणी केली होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात टोकन बुक होणारी ही इतिहासातील पहिली बैलगाडा शर्यत आहे. आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून या स्पर्धा भरवण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये हा ‘रेकॉर्ड ब्रेक’उत्सव होत आहे. शेतकरी, बैलगाडा मालकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती जय हनुमान बैलगाडा मंडळाचे अध्यक्ष हनुमंत जाधव यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!