Share

“उथळ वागण्यातून गल्लीत खळखळ करणाऱ्यांनी जानकर साहेबांकडून बोध घ्यावा”, रोहित पवारांचा टोला

Published On: 

मुंबई: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त चौंडी (जामखेड) येथे राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही उपस्थिती होती. मात्र यानिमिताने चौंडीत जाण्यापासून भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना पोलिसांनी अडवल्याने भाजपने मविआ सरकारवर प्रचंड टीका केली. तर दुसरीकडे राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी रोहित पवारांचे कौतुक केले. यावरूनच रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

“आपल्या उथळ वागण्यातून गल्लीत खळखळ करणाऱ्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती स्वकर्तृत्वावर दिल्लीत साजरी करणाऱ्या जानकर साहेबांकडून बोध घ्यावा आणि अहिल्यादेवींसारख्या महान व्यक्तींचे विचार लोकांपर्यंत पोचवता येत नसतील तर किमान त्यांना संकुचित करण्याचं काम तरी करू नये.”, असा टोला रोहित पवार यांनी ट्वीट करत लगावला आहे.

दरम्यान महादेव जानकर यांनी काल दिल्लीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी केली. तसेच अहिल्यादेवी  यांची जयंती साजरी करण्याचा सर्वांचा अधिकार असून रोहित पवार यांनी जयंती साजरा करून चांगले कार्य केले असल्याचे जानकर यांनी म्हटले आहे. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, “आहिल्यादेवी होळकर यांची जयंती चौंडीला नेहमी कुठलाही पक्ष अभिनिवेश न ठेवता साजरी केली जाते. सर्व प्रकारचे लोक त्या ठिकाणी येतात. पण मला असं वाटतं की यावेळी सरकारी तंत्राचा उपयोग करून, या ठिकाणी पुण्यश्लोक राजमाता आहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी हायजॅक करण्याचा प्रयत्न हा झालेला आहे. हे अत्यंत चुकीचं आहे.”

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!