Share

ऑलिम्पिक विशेष! सप्तपदक मंडळातील पाचवा शिलेदार ‘बजरंग पुनिया’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने आतापर्यंतच्या ऑलिम्पिक इतिहासातील सर्वाधीक पदके पटकावली. या स्पर्धेत भारताने १ सुवर्ण, २ रौप्य आणि ४ कांस्यपदकाची कमाई केली. या पदकविजेत्यांचा घेतलेला हा आढावा. यातील पाचवा पदकविजेता खेळाडू बजरंग पुनिया.

भारताला आखाड्याचा देश म्हणून ओळखले जाते. त्यामुळे ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीपटूकडून पदकाची अपेक्षा ही असतेच. मात्र स्पर्धेपुर्वी पदकविजेता भारतीय कुस्तीपटु सुशील कुमार खुनाच्या आरोपाखाली गजाआड गेल्याने कुस्तीत पदक कोण आणणार असा प्रश्न भारतीय चाहत्यांना पडला होता. यात भारतीय कुस्तीपटू रवी दहियाने रौप्यपदकाची कमाई करत कुस्तीत पहिले पदक पटकावले. यानंतर स्पर्धेच्या अंतिम दिवशी कुस्तीपटु बजरंग पुनियाने कांस्यपदक पटकावत कुस्तीतील भारताची मक्तेदारी सिद्ध केली.

बजरंग पुनियाने पुरुषांच्या फ्रि स्टाईल ६५ किलो वजनी गटातील कुस्तीत सहभाग नोदंवला होता. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात बजरंगने इराणचा कुस्तीपटू मुर्तुझा घियासीना नमवत उपांत्यपुर्व फेरीत धडक मारली. उपांत्यपुर्व फेरीत किर्गिझस्तान कुस्तीपटू इर्नाझर अक्मताली ला नमवत बजरंगने उपांत्य फेरीत धडक मारली. उपांत्यफेरीत बजरंगला अझरबैजानच्या हाजी अलियेव विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. गुढघ्याला झालेल्या दुखापतीमुळे बजरंग या लढतीत पुर्ण क्षमतेने लढु शकला नाही. मात्र यानंतर झालेल्या कांस्यपदकाच्या लढतीत त्याने कझाकिस्तानच्या दौलत निजबेकोव्हला नमवत कांस्यपदक आपल्या नावे केले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!