🕒 1 min read
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेशला स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत ५० टक्क्यांच्या मर्यादेत ओबीसी आरक्षण लागू करण्यास मंजुरी दिली आहे. राज्यात ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. सुप्रीम कोर्टाने मध्य प्रदेश सरकारच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.
मध्य प्रदेशातील स्थानिक निवडणुकांसह ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दिला आहे. यावरूनच महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भाजपा असे चित्र पाहायला मिळत आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, “राज्य सरकारला ओबीसींना आरक्षण द्यायचं नाही आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची मविआ सरकारकडून हत्या करण्यात आली आहे”.
या प्रकरणी नाना पटोले यांची प्रतिक्रिया –
मध्य प्रदेशला ओबीसी आरक्षण दिल्या नंतर महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भाजपा असे चित्र पाहायला मिळत आहे. या विषयावरूनच आता नाना पटोले यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. “एका आठवड्यात मध्य प्रदेशात काय चमत्कार झाला? केंद्रात बसलेल्या भाजपा सरकारने त्यांना इम्पेरिकल डाटा दिला का? हे काही अजून आम्हाला कळत नाही. सूडबुद्धीने केंद्राचं भाजपा सरकार वागत आहे. ओबीसी समाजाचं सामजिक आणि राजकीय आरक्षण संपण्याचा घाट सुरु आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय वाचल्यानंतर यावर प्रतिक्रिया देता येईल. पण चार दिवसांपूर्वी मध्य प्रदेश सरकारचंही ओबीसी आरक्षण थांबवलं होतं. मग चार दिवसात काय चमत्कार झाला? हा परिक्षणाचा भाग आहे”, असा संशय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

