Share

अवैध गर्भपात प्रकरणातील आरोपी सुदाम मुंडेला जामीन मंजूर!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : राज्यभर गाजलेल्या अवैध गर्भपात प्रकरणी आरोपी असलेल्या सुदाम मुंडेला उच्च न्यायालयाकडून (12 मे) जामीन मंजूर करण्यात आला आहे. सुदाम मुंडेला 10 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्यानंतर सुदाम मुंडेला औरंगाबाद खंडपीठाने 5 वर्षासाठी वैद्यकीय व्यवसाय न करण्याच्या अटीवर जामीन दिला होता. त्यानंतरही बीडच्या जिल्हाधिकार्‍यांकडे काही तक्रारी प्राप्त झाल्यानंतर बोगस डॉक्टर शोध कमिटीने परळीतील रामनगर येथे 5 सप्टेंबर 2020 रोजी आरोपी मुंडेच्या दवाखान्यावरती छापा टाकला होता. त्यानंतर त्या ठिकाणी 4 रुग्ण उपचार घेताना आढळले. तसेच वैद्यकीय उपकरणे व साहीत्य आढळून आले. याबाबत तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी तक्रार दिली होती.

या छाप्यावेळी सुदाम मुंडे यांनी सर्व पथकाला धमकी दिली व सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण केला. याप्रकरणी अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी सुदाम मुंडेला 23 फेब्रुवारी 2022 रोजी भारतीय दंड विधान कलम 353 प्रमाणे 4 वर्षे सक्तमजुरी आणि 2 हजार रुपये दंड कलम 33 (2) मेडीकल व्यवसाय कायदयान्वये 3 वर्षे शिक्षा आणि कलम 15 (2) इंडीयन मेडीकल काउंसिल कायद्यान्वये एक वर्षे सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली होती.

या निर्णयाविरोधात आरोपी सुदाम मुंडेने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अपील दाखल केली होती. सुदाम मुंडेच्या वकिलांनी प्रभावी युक्तीवाद करताना सदर प्रकरणात कलम 353 लागू होणार नाही, असे खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. त्यांचा बचाव ग्राह्य धरुन उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती आर.जी.अवचट यांनी डॉ.सुदाम मुंडेचा जामीन अर्ज मंजूर केला. या प्रकरणात आरोपी सुदाम मुंडेतर्फे अ‍ॅड.शशिकांत एकनाथराव शेकडे यांनी काम पाहिले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!