🕒 1 min read
मुंबई : ‘बिग बॉस’ फेम राखी सावंत नेहमी काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. यावेळेस राखी सावंत तिच्या नवीन बॉयफ्रेंडमुळे चर्चेत आहे. राखी सावंत मागच्या काही दिवसांपासून आदिल खान दुर्रानीला डेट करत आहे. तिच्या या नवीन रीलेशनशिपमुळे ती सोशल मिडीयावर आता चर्चेत आहे. एका मुलाखतीमध्ये राखीने रिलेशनशिप आणि बॉयफ्रेंडबद्दल काही खुलासे केले आहेत.
मागच्या वर्षी राखीने बिग बॉसच्या घरात पती रितेशची ओळख करून दिली होती. पण बिग बॉस मधून बाहेर पडल्यानंतर काही दिवसांनी लगेच राखीचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर आता राखी पुन्हा एकदा प्रेमात पडली आहे, असे तिने नुकतच एका मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं आहे. या नवीन रीलेशनशिपमुळे ती सध्या सोशल मिडीयावर चर्चेत आहेत.
राखी सावंतने सांगितलं की, रितेश सोबत घटस्फोट झाल्यानंतर मी डिप्रेशनमध्ये गेली होती. या डिप्रेशनच्या काळामध्ये आदिल तिच्या आयुष्यात आला. त्याने राखीला या सर्व गोष्टींमधून बाहेर पडण्यास मदत केली. आमची ओळख झाल्यानंतर एक महिन्याने आदिलने मला प्रपोज केलं. आदिल माझ्यापेक्षा ६ वर्षांनी लहान आहे. मी या नात्यासाठी पहिल्यांदा बिल्कुल तयार नव्हते, असेही राखीने म्हंटले आहे.
आदिलने मला मलायका – अर्जुन, प्रियांका- निक यांचे उदाहरण देऊन समजावले, मग मी देखील आदिलच्या प्रेमात पडले, असं राखी सावंत म्हणाली. आदीलची आणि राखीची ओळख होण्याच कारण म्हणजे, आदिलची बहिण शैली ही राखी सावंतची चांगली मैत्रीण आहे. तिच्यामुळेच आदिलची आणि राखीची ओळख झाली होती. आदिल हा मुळचा मैसूरचा आहे. आदिल हा बिझनेसमन आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी आदिलने राखीला बीएमडब्ल्यू कार गिफ्ट केली होती. त्याची देखील खूप चर्चा चालू होती.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

