Share

“एका आठवड्यात मध्य प्रदेशात काय चमत्कार झाला?”; नाना पटोले यांचं भाजपावर टीकास्त्र

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेशला स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत ५० टक्क्यांच्या मर्यादेत ओबीसी आरक्षण लागू करण्यास मंजुरी दिली आहे. राज्यात ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. सुप्रीम कोर्टाने मध्य प्रदेश सरकारच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर भाजपाने राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. या पाश्वर्भूमीवरून महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भाजपा असे चित्र पाहायला मिळत आहे. या विषयावरूनच आता नाना पटोले यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे.

“एका आठवड्यात मध्य प्रदेशात काय चमत्कार झाला? केंद्रात बसलेल्या भाजपा सरकारने त्यांना इम्पेरिकल डाटा दिला का? हे काही अजून आम्हाला कळत नाही. सूडबुद्धीने केंद्राचं भाजपा सरकार वागत आहे. ओबीसी समाजाचं सामजिक आणि राजकीय आरक्षण संपण्याचा घाट सुरु आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय वाचल्यानंतर यावर प्रतिक्रिया देता येईल. पण चार दिवसांपूर्वी मध्य प्रदेश सरकारचंही ओबीसी आरक्षण थांबवलं होतं. मग चार दिवसात काय चमत्कार झाला? हा परिक्षणाचा भाग आहे”, असा संशय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

निलेश राणे ओबीसी आरक्षणावर काय म्हणाले ?

मध्य प्रदेशमध्ये सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाला मान्यता दिली आहे. मध्यप्रदेशमध्ये स्थानिक निवडणुकीत ओबीसी आरक्षणाला मान्यता मिळाल्याने महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात अनेक चर्चा रंगताना दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवरच भाजप नेते निलेश राणे यांनी राज्यातील ओबीसी नेत्यांवर निशाणा साधला आहे. “ठाकरे सरकारचं तोंड पुन्हा एकदा काळं झालं आहे. फालतू टाईमपास करण्यामध्ये या सरकारचा वेळ जातो आणि अक्कल गुडघ्यात असल्यामुळे समाजहिताची कामं याना जमणार नाही. ठाकरे सरकार मधल्या ओबीसी नेत्यांनी लाज असेल तर राजीनामे देऊन बाहेर पडावं नाही तर समाज तुम्हाला माफ करणार नाही.”, असा टोला निलेश राणे यांनी ट्वीट करत लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!