🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) कोलकाता नाईट रायडर्सचा सलामीवीर फलंदाज आणि मराठमोळा म्हणून ओळखला जाणारा खेळाडू अजिंक्य रहाणे आयपीएलच्या यंदाच्या हंगामातून बाहेर पडला आहे. सुरुवातीला त्याला त्याच्या खराब कामगिरीमुळे मैदानात उतरवण्यास डावलण्यात आले. मात्र आता त्याला दुखापत झाल्याने तो आयपीएल (IPL 2022) चे उरलेले सामने खेळणार नाही. कोलकाताने त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून याची माहिती दिली आहे. याचवेळी रहाणेने पुढच्या वर्षी जबरदस्त कमबॅक करण्याचे संकेत दिले आहेत.
डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे, अजिंक्य रहाणेच्या स्नायूंमध्ये दुखापत झाली आहे. कोलकाताने त्यांच्या ट्विटर खात्यावरून व्हिडिओ शेअर करत रहाणे दुखापतीमुळे हंगाम सोडत असल्याची माहिती दिली आहे. याशिवाय अजिंक्य रहाणेने पुढच्या वर्षी दमदार पुनरागमन करण्याचा दावा केला आहे. कोलकाताने केलेल्या ट्विटमध्ये, अजिंक्य रहाणे हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीने ग्रस्त आहे. त्यामुळे तो आयपीएल २०२२ (IPL 2022) मधून बाहेर पडला आहे. अजिंक्य लवकर बरा होईल अशी आम्ही आशा करतो. आम्हाला तुझी उणीव भासेल.
???? ???????????????????????????????? ????????????????????????????????????????????????
Ajinkya Rahane is going to miss the remaining games of #IPL2022 due to a hamstring injury.
Wish you a speedy recovery, @ajinkyarahane88. The Knights camp will miss you ????#AmiKKR #IPL2022 pic.twitter.com/aHDYmkE2f0
— KolkataKnightRiders (@KKRiders) May 17, 2022
ट्विटरवरील व्हिडीओमध्ये अजिंक्य रहाणे म्हणतो, मी टीमसोबत मैदानात आणि बाहेर दोन्हीकडे खूप आनंदात राहिलो आहे. मी या ठिकाणी क्रिकेटर म्हणून खूप काही शिकलो. मी सर्व खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि मॅनेजमेंटच्या लोकांना धन्यवाद देऊ इच्छितो. नक्कीच मी पुढच्या वर्षी जोमाने कमबॅक करेन. मला विश्वास आहे की, आम्ही संघ म्हणून पुढच्या सामन्यात एका संघाच्या रूपाने चांगला खेळ करू. मला आशा आहे की, कोलकाता प्ले-ऑफमध्ये पोहोचणार आहे, असंही रहाणेने सांगितलं.
BREAKING: Ajinkya Rahane is going to miss the remaining games of #IPL2022 due to a hamstring injury pic.twitter.com/TixgPzZWFq
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) May 17, 2022
महत्वाच्या बातम्या:
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

