Share

‘ओबीसी आरक्षण केवळ महाराष्ट्रात रद्द झाले, केंद्रावर खापर फोडता येणार नाही’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ओबीसी आरक्षणाचा (OBC reservation) मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे. राज्य सरकारने सादर केलेल्या अध्यदेशाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. यावर राज्य सरकारकडून केंद्रावर खापर फोडले जात असल्याचा आरोप विरोधीपक्षनेत्यांतून होत आहे. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाल्यामुळे विरोधक आक्रमक झाले आहे. आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

चंद्रकांत पाटील ट्विट करत म्हणाले, ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण केवळ महाराष्ट्रातच रद्द झाले, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे खापर केंद्र सरकारवर फोडता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने सुचवलेली पाऊले उचलण्यात टाळाटाळ करून मविआ सरकारने अध्यादेश काढला, म्हणूनच न्यायालयाने हा अध्यादेश रद्द केला. असा आरोप चंद्रकांत पाटलांनी केला आहे.

सध्या महाराष्ट्रातील नगरपंचायतीच्या निवडणुका जाहिर झाल्या आहेत. येत्या २१ डिसेंबर रोजी या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. ओबीसी आरक्षण स्थगितीमुळे होऊ घातलेल्या निवडणुकीतील ओबीसी जागांची निवडणूक होणार नाही. त्यामुळे ओबीसी समाजात अन्यायाची भावना निर्माण झाली असून अनेक ठिकाणी ओबीसी समाजाने मतदानावर बहिष्कार टाकण्याचा ईशारा दिला आहे. तसेच आरक्षण लागू होईपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्याची मागणीही करण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!