Share

“आता अशी माणसं दुर्मीळच झाली आहेत”, संजय राऊतांची प्रतापभाई आशर यांना श्रद्धांजली

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते प्रतापभाई आशर (Pratapbhai Asher) यांचे आज (९ एप्रिल) निधन झाले. पक्षाला वाहून घेतलेला समर्पित कार्यकर्ता अशी प्रतापभाईंची ओळख होती. महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष, कार्यालय प्रभारी अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी अनेक वर्षे समर्थपणे सांभाळल्या. त्यांना माझी विनम्र श्रद्धांजली. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो. असे ट्वीट करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

“भारतीय जनता पक्षाचा मुंबईतील जुना जाणता आणि विनम्र चेहरा प्रतापभाई आशर यांना विनम्र श्रध्दांजली.एक निष्कपट राजकीय कार्यकर्ता म्हणून ते सदैव स्मरणात राहतील. आता अशी माणसं दुर्मीळच झाली आहेत.”, असे ट्वीट करत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

https://twitter.com/rautsanjay61/status/1512650073309532160

राजकीय पक्षातील अनेक दिग्गजांनी ट्वीट करत प्रतापभाई आशर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, माजी कोषाध्यक्ष श्री प्रतापभाई आशर यांच्या निधनाने एक मोठा आधारस्तंभ हरपला आहे. कोषाध्यक्ष म्हणून अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी अनेक वर्ष काम केले. मार्गदर्शकाच्या भूमिकेतून अनेकांना त्यांनी पक्षकार्यासाठी प्रेरित केले.अखेरच्या क्षणापर्यंत ते कामात होते. असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या:

“…यानंतरही कुणाच्या इशाऱ्यावर हे सगळं घडल?”, सिल्वर ओक हल्ल्याप्रकरणी मिटकरींचा सवाल

IPL 2022: ‘दिवस खराब होता, मात्र …’ सामना थोडक्यात गमावल्यानंतर कर्णधार मयंकचे भावनिक वक्तव्य

“..त्यावेळी भुजबळांच्या घरावरही शिवसैनिकांनी हल्ला केला होता”, भातखळकरांचे आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

IPL 2022: शतक चार धावांनी मुकला मात्र शुबमन गिल आनंदीत! ‘मॅन ऑफ द मॅच’ जिंकल्यानंतर केले मोठे विधान

IPL 2022: पंजाबवर रोमहर्षक विजयानंतर कर्णधार हार्दिककडून तेवतीयाचे कौतुक; म्हणाला “त्याला सलाम…”

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!