Share

IPL 2022: शतक अवघ्या चार धावांनी हुकले, मात्र शुबमन गिल आनंदीत! ‘मॅन ऑफ द मॅच’ जिंकल्यानंतर केले मोठे विधान

Published On: 

मुंबई: पंजाब किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्यात शुभमन गिलला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार देण्यात आला. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पंजाबने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना १८९ धावा केल्या. जो गुजरात संघाने ६ विकेट्स शिल्लक असताना पार केला. गुजरात टायटन्ससाठी या सामन्यात सर्वात मोठा हिरो ठरला तो शुभमन गिल, ज्याने ९६ धावांची खेळी खेळून आपल्या संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.

सामन्यात शुबमनचे (Shubman gill) शतक अवघ्या ४ धावांनी हुकले मात्र यानंतरही संघाने सामना जिंकल्याने तो आनंदित दिसला. शुबमन म्हणाला, ”स्कोअरबोर्ड चालू ठेवणे महत्त्वाचे आहे, तसेच अंतर शोधणे देखील महत्त्वाचे आहे. कारण हा त्या दिवसांमधील एक दिवस होता जेव्हा मी चेंडूला चांगला मारत होतो आणि अंतर देखील शोधत होतो. मी चेंडू जोरात मारतोय. कदाचित तसं दिसत नसेल पण मी पूर्ण ताकदीने चेंडू मारण्याचा प्रयत्न करतो. सलामीवीर म्हणून मला संपूर्ण डावात फलंदाजी करावी लागते जेणेकरून खालच्या फळीतील फलंदाजांसाठी ते सोपे होईल. मी किमान डॉट बॉल खेळण्याचा प्रयत्न करतो.”

आयपीएल २०२२ मध्ये शुभमन गिल पूर्णपणे नवीन शैलीत फलंदाजी करताना दिसत आहे. या सामन्यातही पंजाबने दिलेल्या १९० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सच्या फलंदाजांमध्ये या मोठ्या लक्ष्याबाबत कोणताही ताण नव्हता. शुबमन गिल, हार्दिक पंड्या (hardik pandya) आणि राहुल तेवतीया (rahul tewtia) या तिघांनी फलंदाजीत प्रभावी कामगिरी करत विजय निश्चित केला.

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!