🕒 1 min read
मुंबई: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्वर ओक’ या निवासस्थानाबाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी काल (८ एप्रिल) जोरदार आंदोलन केले. यानंतर राष्ट्रवादीकडून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. आता राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनीही यावर प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे.
“ह्यापूर्वी असे हल्ले पाहिले नव्हते. मा. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही कुणाच्या इशाऱ्यावर हे सगळ घडल? दारु पिलेले उन्मत्त कोण होते, कसे आले, कुठून आले? तळापर्यंत शिरून याचा शोध लागायलाच हवा.भ्याड हल्ल्याचा निषेध.”, असे अमोल मिटकरी यांनी ट्वीट करत म्हटले आहे.
तसेच त्यांनी यावरून थेट गुणरत्न सदावर्ते यांना निशाण्यावर धरले आहे. “लोकनेते शरदचंद्रजी पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्वर ओक येथे गुणरत्न सदावर्ते या भाजपच्या दलालाच्या नादाला लागून काही गुंड प्रवृत्तीच्या जमावानी जो भ्याड हल्ला केला त्या हल्ल्याचा अकोला महानगरच्या राष्ट्रवादीच्या वतीने निषेध व्यक्त केला. सदावर्तेमुळे महाराष्ट्राच्या सुसंस्कृतपणाला हरताळ फासण्याचा प्रयत्न झाला आहे. यामागील मास्टरमाइंड शांत बसून आसुरी आनंद घेत आहेत. विरोधी पक्षाचे नेते साधा शब्दही काढायला तयार नाहीत. जे चाललंय ते खरच खुप भयंकर आहे. हिटलरच्या दलालांना याची किंमत मोजावीच लागेल.”, असा इशारा अमोल मिटकरी यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या:
IPL 2022: ‘दिवस खराब होता, मात्र …’ सामना थोडक्यात गमावल्यानंतर कर्णधार मयंकचे भावनिक वक्तव्य
IPL 2022: शतक चार धावांनी मुकला मात्र शुबमन गिल आनंदीत! ‘मॅन ऑफ द मॅच’ जिंकल्यानंतर केले मोठे विधान
IPL 2022: पंजाबवर रोमहर्षक विजयानंतर कर्णधार हार्दिककडून तेवतीयाचे कौतुक; म्हणाला “त्याला सलाम…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
