मुंबई: एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन संपले असे वाटत असताना काल (८ एप्रिल) अचानक शेकडोच्या संख्येने आलेल्या कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानात घुसून घरावर चप्पल आणि दगडफेक केली. या प्रकरणावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) यांनी महाराष्ट्राचे राजकारण इतके घाणेरडे कधीच नव्हते. यापूर्वी कुणाच्याच घरावर अशाप्रकारचे आंदोलन झाले नव्हते. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन कठोर कारवाई केली जाईल. असे म्हटले. तर यालाच भाजप नेते अतुल भातखळकर यांनी छगन भुजबळ यांचा संदर्भ देत प्रत्युत्तर दिले आहे.
“भुजबळ विरोधी पक्षनेते असताना त्यांच्या घरावर शिवसैनिकांनी हल्ला केला होता. किमान स्वतःच्या पक्षाचा इतिहास तरी माहिती असावा. तुम्ही घातलेला लोकशाहीचा झगा अगदीच नवा नवा आहे.”, असा टोला अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत लगावला आहे.
दरम्यान या आंदोलनानंतर राष्ट्रवादीकडूनही संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी थेट गुणरत्न सदावर्ते यांना निशाण्यावर धरले आहे. “लोकनेते शरदचंद्रजी पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्वर ओक येथे गुणरत्न सदावर्ते या भाजपच्या दलालाच्या नादाला लागून काही गुंड प्रवृत्तीच्या जमावानी जो भ्याड हल्ला केला त्या हल्ल्याचा अकोला महानगरच्या राष्ट्रवादीच्या वतीने निषेध व्यक्त केला. सदावर्तेमुळे महाराष्ट्राच्या सुसंस्कृतपणाला हरताळ फासण्याचा प्रयत्न झाला आहे. यामागील मास्टरमाइंड शांत बसून आसुरी आनंद घेत आहेत. विरोधी पक्षाचे नेते साधा शब्दही काढायला तयार नाहीत. जे चाललंय ते खरच खुप भयंकर आहे. हिटलरच्या दलालांना याची किंमत मोजावीच लागेल.”, असा इशारा अमोल मिटकरी यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या:
IPL 2022: पंजाबवर रोमहर्षक विजयानंतर कर्णधार हार्दिककडून तेवतीयाचे कौतुक; म्हणाला “त्याला सलाम…”
IPL 2022: ‘अप्रतिम ,अविश्वसनीय, अद्भुत’; GT vs PKBS सामन्यात घोंगावलं तेवतीया नावाचं वादळ!
IPL 2022: लिविंगस्टोनची दमदार बॅटिंग आणि राशीद खानची फिरकी; गुजरात पुढे १९० धावांचे लक्ष्य!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

