Share

Kishori Pednekar । शपथ घेतल्यानंतर एकही मंत्री बाळासाहेबांच्या स्मृति स्थळावर गेला नाही – किशोरी पेडणेकर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा काल मंत्रिमंडळ विस्तार झाला. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर विरोधी पक्षांकडून आता राज्य सरकारवर टीका होत आहे. या दरम्यान, शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनीही शिंदे गटातील मंत्र्यांवर आणि भाजपवर निशाणा साधला आहे.

 

जे मंत्री महोदय झाले, त्यांचा पाळणा वेगवेगळ्या पक्षात हलला. त्यानंतर ते आमच्याकडे आले, त्यांचाही आम्ही बहुमान केला. शिवसेना आमचीच, धनुष्यबाण आमचंच, बाळासाहेबही आमचेच असे म्हणणाऱ्यांना मंत्रीपदाची शपथ घेताना बाळासाहेबांची आठवण झाली नाही. मंत्रीपदाची शपथ घेऊन 12 तासांच्यावर वेळ उलटून गेला. पण एकही आमदाराला बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर जाऊन दर्शन घ्यावे, असे वाटले नाही. याचा अर्थ फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी बाळासाहेबांचे नाव वापरायचे आणि बाळासाहेबांच्या घराण्याला, ठाकरे घराण्याला संपवायचे कसे, याचा विडा यांनी उचलला आहे”, असा आरोप किशोरी पेडणेकर यांनी केला.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!