मुंबई : केंद्र सरकारच्या खासगीकरण धोरणाविरोधात देशभरातील वीज कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असून २८ आणि २९ मार्च रोजी सर्व वीज कर्मचारी संपावर गेले आहेत. यामध्ये प्रामुख्याने वीज, बँकिंगसह अनेक कामगार संघटना सहभागी झाल्या आहेत. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आता राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी वीज मंडळाच्या कुठल्याही कंपनीचे खासगीकरण केले जाणार नाही तसेच वीज कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा करून तोडगा काढला जाईल,अशी ग्वाही दिली आहे.
यासंदर्भात नितीन राऊत यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की, ‘वीज मंडळाच्या कुठल्याही कंपनीचे खासगीकरण केले जाणार नाही. वीज कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा करून तोडगा काढला जाईल,अशी ग्वाही मी वीज कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींशी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करून दिली.’
दरम्यान, पुढे ते म्हणाले की, ‘उद्या दुपारी मंत्रालयात प्रत्यक्ष बैठक घेऊन सर्व मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करू, कृपया संप मागे घ्या, अशी विनंती मी कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींना केली. माझ्या विनंतीला मान देऊन त्यांनी उद्या चर्चा करण्यास मान्यता दिली. त्याबद्दल सर्वांना धन्यवाद.’
महत्वाच्या बातम्या
- “आमची ५ मुलं…”, पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू इम्रान खानबद्दल पूर्व पत्नीचा धक्कादायक खुलासा!
- कर्नाटक राज्यातील ११७ किमी लांबीचा रस्ता ऑक्टोबर २०२२ पर्यंत पूर्ण होणार- नितीन गडकरी
- ‘पुष्पा २’ मधून सामंथा आउट? ‘या’ हिरॉईनला मिळणार संधी
- “…तर देशात एक वाक्यता टिकणार कशी?”, ‘द कश्मीर फाइल्स’वरून शरद पवारांचा पंतप्रधान मोदींना सवाल
- IPL 2022 : तेरी झलक मोईन अली…! CSKच्या संघात आनंदाचं वातावरण; पाहा VIDEO!


