Share

“सुजय विखे पाटलांचे पूर्ण कुटुंब एकेकाळी काँग्रेसमध्येच होते, त्यामुळे…”,अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया

Published On: 

उस्मानाबाद : काल (२७ मार्च) प्रसार मध्यमांशी संवाद साधत असतांना भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. तसेच राष्ट्रवादी नवरा, शिवसेना बायको अन् काँग्रेस वऱ्हाडी, असे वर्णनही केले. दरम्यान, यावरून आता राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेसचे मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavhan) यांनी विखे-पाटील यांच्या टीकेला उत्तर दिले आहे.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना अशोक चव्हाण म्हणाले की,‘सुजय विखे पाटील हे नवखे असून ज्या काँग्रेसवर ते टीका करत आहेत, त्या काँग्रेसमध्ये एकेकाळी त्यांचे सर्व कुटुंबच होते. त्यामुळे त्यांनी अशी टीका करण्यापेक्षा सकारात्मक भूमिका घ्यावी,’असे चव्हाण म्हणाले.

दरम्यान, ‘महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नवरा, शिवसेना बायको तर काँग्रेस ही जेवणापुरती आलेले वऱ्हाडी आहेत. नवऱ्याने दुसरी सवत आणू नये म्हणून शिवसेना मूकपणे अन्याय सहन करीत आहे. कितीही तिरस्कार केला तरी जेवणासाठी वऱ्हाडी म्हणून आलेली काँग्रेस हटायला तयार नाही’, असे सुजय विखे पाटील म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!