मुंबई : देशभरात सध्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटवरून राजकारण चांगलेच पेटले असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, यावर राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया उमटत असतानाच आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनीही यावर भाष्य केले आहे. तसेच पंतप्रधानांनीच सिनेमा पाहण्याचं आवाहन केलं तर देशात एक वाक्यता टिकणार कशी?, असा सवालही पवारांनी केला आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना शरद पवार म्हणाले की,‘या चित्रपटामधून मन जोडण्याऐवजी मन विचलित कशी होतील हे पाहिले गेले. शिवाय समाजा-समाजात अंतर कसं वाढेल, द्वेष कसा वाढेल या प्रकारची मांडणी करण्यात आली. तसेच जेव्हा समाजात विद्वेष वाढवण्याची भूमिका कोणी मांडत असेल आणि तो चित्रपट अतिशय चांगला आहे, असे देशाचे पंतप्रधान म्हणत असतील तर सामाजिक एक वाक्यता टिकवायची कशी?’, असे पवार म्हणाले आहेत.
दरम्यान, देशभरात ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली आहे. तसेच हा सिनेमा म्हणजे काश्मीरी पंडितांवर झालेल्या अन्यायाचा ज्वलंत इतिहास असल्याचे भाजपकडून सांगण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- “सुजय विखे पाटलांचे पूर्ण कुटुंब एकेकाळी काँग्रेसमध्येच होते, त्यामुळे…”,अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया
- कर्नाटक राज्यातील ११७ किमी लांबीचा रस्ता ऑक्टोबर २०२२ पर्यंत पूर्ण होणार- नितीन गडकरी
- IPL 2022 : …म्हणून आम्ही हरलो! रोहितनं सांगितलं मुंबईच्या पहिल्या पराभवाचं कारण; नक्की वाचा!
- ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ‘या’ भारतीयाचा बोलबाला!
- “आमदारांना मुंबईत घरे देण्याचा निर्णय झालेला नाही” – अशोक चव्हाण


