Share

कर्नाटक राज्यातील ११७ किमी लांबीचा रस्ता ऑक्टोबर २०२२ पर्यंत पूर्ण होणार- नितीन गडकरी

Published On: 

मुंबई: NH-275 चा बेंगळुरू-निदाघट्टा -म्हैसूर विभाग हा कर्नाटक राज्यातील ११७ किमी लांबीचा भाग आहे. तब्बल 8,350 कोटी खर्चून हा भाग विकसित केला जात असून बांधकाम पूर्णत्वाच्या जवळ आहे आणि ऑक्टोबर 2022 पर्यंत हे बांधकाम पूर्ण होईल.या रस्त्यामुळे बंगळुरू ते म्हैसूर प्रवासाचा वेळ 3 तासांवरून केवळ 75 मिनिटांपर्यंत कमी होईल. हे दोन महत्त्वाच्या शहरांमधील कनेक्टिव्हिटी वाढवेल आणि या प्रदेशातील पर्यटन आणि अर्थव्यवस्थेला चालना देईल. असे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari,) यांनी ट्वीट करत म्हटले आहे.

यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख करत म्हटले की, “पंतप्रधानांच्या गतिमान नेतृत्वाखाली अशा विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांची घोषणा मोठ्या जबाबदारीने करण्यात आली आहे आणि ती भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक आणि कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याची आमची अटूट बांधिलकी आहे.”, अशी ग्वाही नितीन गडकरी यांनी दिली आहे.

सोबतच या अत्याधुनिक प्रकल्पात 8 किमी लांबीचा उन्नत कॉरिडॉर, 9 मोठे पूल, 42 छोटे पूल, 64 अंडरपास, 11 ओव्हरपास, 4 ROB आणि 5 बायपास अशा अनेक संरचना आहेत ज्यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल आणि प्रदूषण लक्षणीयरीत्या कमी होईल. अशी माहिती नितीन गडकरी यांनी ट्वीट करत दिली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!