मुंबई : पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज इम्रान खानने आपल्या दमदार गोलंदाजीने पाकिस्तान क्रिकेटला नव्य उंचीवर नेले. मात्र त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील वादग्रस्त गोष्टी कोणापासून लपून राहिलेली नाही. पाकिस्तानचे पंतप्रधान आणि पाकिस्तान संघाचे माजी खेळाडू इम्रान खान त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. त्यांच्या अफेअरच्या बातम्यांच्या चर्चा पाकिस्तानात नेहमीच होतात. त्यांचे नाव बेंजरी भुट्टो ते बॉलिवूड अभिनेत्री झीनत अमान यांच्याशी जोडले गेले आहे. आता त्यांनी पत्नी रेहम खानने आपल्या पुस्तकात इम्रान खानबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे.
इम्रान खानने (imran khan) ६ जानेवारी २०१५ रोजी पत्रकार रेहम खानसोबत दुसरे लग्न केले, पण अवघ्या ८ महिन्यांतच दोघांचा घटस्फोट झाला. त्यांची दुसरी पत्नी रेहम खान (reham khan) हिने एक पुस्तक लिहिले आहे ज्यामध्ये तिने इम्रान खानवर अनेक मोठे आरोप केले आहेत. ज्यात तिने लिहले, ‘लग्न होऊन काही आठवडेच झाले होते. आम्ही टायरियनबद्दल बोलत होतो. ज्याचे वडील इम्रान खान असल्याचे सांगितले जात होते. इम्रानने मला सांगितले की तुला माहित आहे की ती एकटीच माझी नाही. एकूण ५ आहेत ज्यांच्याबद्दल मला माहिती आहे.” हे ऐकून मला धक्काच बसला. मी इम्रानला विचारले ५ काय इम्रान ? त्यावर इम्रान हसला आणि म्हणाला – ‘मुलं, अजून काय. मी पुन्हा इम्रानला विचारले, तुला पाच अवैध मुले आहेत का? आणि तुला हे कसे कळले? ज्यावर इम्रान म्हणाला की, त्याच्या आईने मला याबद्दल सांगितले.”
रेहमने पुढे त्याच्या मुलांची चौकशी केली असल्याचे लिहले, ‘मी त्याला विचारले की मुले कोणी इंग्रज आहेत का? तर इम्रान म्हणाला नाही काही भारतीय पण आहेत. आणि मोठा मुलगा आता ३४ वर्षांचा आहे. मी इम्रानला विचारलं हे सगळं कसं? त्या मुलाची आई आजपर्यंत का पुढे आली नाही? ज्यावर इम्रान म्हणाला – ती गर्भवती राहू शकत नाही. जेव्हा ती गरोदर राहिली तेव्हा तिला खूप आनंद झाला, तिने त्या मुलाला ठेवण्याची विनंती केली. तर मी पण म्हटलं ठीक आहे.” इम्रान खानबद्दल केलेल्या या खुलास्याने खळबळ माजली आहे.
महत्वाच्या बातम्या
- कर्नाटक राज्यातील ११७ किमी लांबीचा रस्ता ऑक्टोबर २०२२ पर्यंत पूर्ण होणार- नितीन गडकरी
- “सुजय विखे पाटलांचे पूर्ण कुटुंब एकेकाळी काँग्रेसमध्येच होते, त्यामुळे…”,अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया
- “आमदारांना मुंबईत घरे देण्याचा निर्णय झालेला नाही” – अशोक चव्हाण
- IPL 2022: MI विरुद्ध ‘मॅन ऑफ द मॅच’ जिंकल्यानंतर कुलदीपचे भावनिक वक्तव्य ; म्हणाला “रोहितने मला…”
- ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ‘या’ भारतीयाचा बोलबाला!

