🕒 1 min read
पुणे : पुण्यातील चांदणी चौक येथे होणाऱ्या वाहतुकीच्या गर्दीमुळे सर्वजण त्रास आहेत. ही गर्दी पार करण्यासाठी अनेक तास लागतात. यामुळेच चांदणी चौकात होणारी वाहतूक कोंडी लवकरच सुटली जाणार असल्याचं नितीन गडकरी यांनी म्हटल आहे. याबाबत अध्यक्षतेखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर नुकतीच बैठक देखील झाली आहे. यानंतर नितीन गडकरी यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषद मध्ये काही महत्त्वाच्या योजनांबद्दल माहिती दिली आहे.
नितीन गडकरी यांचा मेगा प्लॅनः
चांदी चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी येथे दोन ते तीन दिवसात फुल पाडण्यात येणार आहे, अशी माहिती गडकरींनी दिली आहे. तसेच वेळेत काम झाल्यास नव्या पुलाचं उद्घाटन देखील लवकर करण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
पाहा व्हिडीओः
पुणे येथे डबल डेकर इलेक्ट्रिक बसः
पुण्यात डबल डेकर इलेक्ट्रिक बस सुरू करण्याचा विचार चालू असून केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी चांदणी चौक परिसरात भेट दिली. यावेळी त्यांनी पुणे जिल्ह्यातील आणि पुण्याशी जोडलेले रस्त्याच्या कामासंदर्भात चर्चा केली. पुण्यातील रस्ते सुसज्ज होण्यासाठी आणि वाहतूक कोंडी फोडण्यासाठी चाकण एमआयडी पासून 27 मीटर अंतरावर असलेल्या पावलेवाडी येथे 180 हेक्टर मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क भरण्यात येणार आहे. यासाठी एमआयडीसी सोबत सामंजस्याचा करार देखील झाला आहे.
दरम्यान, पुणे ते शिरूर आणि नगर – औरंगाबाद जुन्या रोडवर तीन मजली रस्त्याच्या डिझाईनचं काम चालू आहे. त्याचबरोबर तळेगाव आणि शिरूर हा मार्ग करण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे मुंबई कडून येणारी वाहन वळवता येतील, असे गडकरी म्हणाले.
महत्वाच्या बातम्याः
- PAK vs HK | पाकिस्तान विरुद्ध हॉककाँग आज सामना, ‘करो या मरो’ची परिस्थिती
- Ambadas Danve | शाळेत दाखला अन् मुले शिक्षणासाठी मदरशात ; अंबादास दानवे यांनी घेतली दखल
- Ajit Pawar | एकनाथ शिंदे चूक की बरोबर, जनताच ठरवेल- अजित पवार
- Breaking News | काँग्रेस पक्षातील मोठा नेता शिंदे गटामध्ये येण्याची शक्यता
- Rashmika Mandana | ‘या’ प्रसिद्ध क्रिकेटपटू सोबत रश्मिका मंदनाचा नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
