🕒 1 min read
मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमामध्ये केलेलं वक्तव्य चांगलंच चर्चेत आलं आहे. या कार्यक्रमात मी विहिरीमध्ये जीव देईन पण मी काँग्रेस मध्ये जाणार नाही, असं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलं होतं.
नितीन गडकरी – मी विहरीत जीव देईन पण काँग्रेस मध्ये जाणार नाहीः
याबाबत सांगत असताना, मी स्टुडन्ट लीडर होतो आणि माझा मित्र श्रीकांत जिचकर मला तू एक चांगला माणूस आहे, एक चांगला राजकारणी आहे, पण तू चांगल्या पक्षात नाही असं म्हणाला होता असल्याचं गडकरींनी सांगितलं. यावर उत्तर देत गडकरी म्हणाले की, मी विहिरीमध्ये जीव देईन, पण काँग्रेसमध्ये येणार नाही. कारण मला काँग्रेसची आयडॉलॉजी पसंत नाही.
जिचकरांनी गडकरींना तुमच्या पक्षाला भविष्य नसल्याचं सांगितलं. यावर गडकरींनी उत्तर देत असेल-नसेल असं म्हटलं होतं.
युद्धभूमीवर हरल्यावर तो संपत नाही तर युद्धभूमी सोडून पळतो तेव्हा तो संपतोः
कार्यक्रमात बोलत असताना नितीन गडकरींनी आमचा पक्ष निवडणूक हरायचा असं सांगितलं. तसेच माझ्या मित्रांनी मला एक पुस्तक भेट दिली होती आणि त्यातलं वाक्य मला अजूनही आठवतं, युद्धभूमीवर हरल्यावर तो संपत नाही तर युद्धभूमी सोडून पळतो तेव्हा तो संपतो. तुम्हाला यश मिळतो त्याचा आनंद फक्त तुम्हाला एकट्याला होतो, तेव्हा त्याचा काही अर्थ नसतो, मात्र, तुम्हाला यश मिळाला त्याचा आनंद तुमच्यापेक्षा जास्त तुमच्या सोबत काम करणाऱ्या लहानांपासून मोठ्यांना होतो तेव्हा त्याला खरं महत्त्व असतं, असं गडकरी यांनी म्हटलं आहे.
पाहा व्हिडीओः
वापरा आणि फेकून द्या, अशे संबंध जोडू नकाः
दरम्यान, नितीन गडकरींनी आपल्या कार्यक्रमात बोलत असताना सर्वांसाठी एक चांगली शिकवण सुद्धा दिली आहे. मानवी संबंध ही सगळ्यात मोठी ताकद असून उद्योग, सामाजिक किंवा राजकारणात देखील त्याचा जास्त महत्त्व आहे. त्यामुळे कधी वापरा आणि फेकून द्या, असे संबंध जोडू नका. चांगले दिवस असो अथवा वाईट दिवस एकाद्याचा हात एकदा पकडला की त्याचा पकडून ठेवा परिस्थितीनुसार बदलू नका, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्याः
- Sharad Pawar । क्रिकेटच्या मैदानात हार्दिक पांड्याची हवा, तर सोशल मीडियाच्या पिचवर शरद पवारांचा डंका
- Gulabrao Patil | “स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर कधीच हातपाय बघत नाही…”; गुलाबराव पाटील
- Asia Cup 2022 । भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय
- Eknath Khadse | मला नाही वाटत लोकं खोक्यांमुळे निवडून येतात – एकनाथ खडसे
- Bachchu Kadu | आम्ही कोणाच्या सांगण्यावरुन बायकोला नाचवणाऱ्यांपैकी नाही – बच्चू कडूcr
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
