मुंबई : भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पार पडला. टीम इंडियाने हा सामना पाच विकेटने जिंकला. आशिया चषक स्पर्धेची भारताने शानदार सुरुवात केली आहे. मागच्यावर्षी टी 20 वर्ल्ड कपच्या साखळी फेरीत याच मैदानात टीम इंडियाचा पाकिस्तानने पराभव केला होता. त्या पराभवाची आज भारतीय संघाने कसर भरून काढली.
हा सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात ऑलराऊंडर हार्दिक पंड्याने षटकार ठोकून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. मोहम्मद नवाजने लास्ट ओव्हर टाकली. अपेक्षेप्रमाणे भारत पाकिस्तान सामना रंगतदार झाला. शेवटच्या षटकापर्यंत चाहते टेन्शनमध्ये होते. अखेरीस भारतीय संघाने हा सामना ५ विकेट्स आणि २ चेंडू राखून जिंकला.
हार्दिक पांड्याने षटकार ठोकत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. शेवटच्या षटकात ७ धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवर जडेजा आऊट झाला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या दिनेश कार्तिकने दुसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली. अखेरच्या ४ चेंडूत भारतीय संघाला ६ धावांची गरज असताना, हार्दिकने तिसरा चेंडू सांभाळून खेळला. त्यानंतर चौथ्या चेंडूवर षटकार लगावत त्याने भारतीय संघाला विजय मिळवून दिला. भारताकडून जडेजाने ३५ धावांची दमदार खेळी साकारली, तर हार्दिकने नाबाद ३३ धावांची खेळी केली.
महत्वाच्या बातम्याः
- Eknath Khadse | मला नाही वाटत लोकं खोक्यांमुळे निवडून येतात – एकनाथ खडसे
- Bachchu Kadu | आम्ही कोणाच्या सांगण्यावरुन बायकोला नाचवणाऱ्यांपैकी नाही – बच्चू कडू
- IND vs PAK | 147 धावांवर पाकिस्तान ऑलआऊट, भुवी आणि हार्दिकचा जोरदार धमाका!
- IND vs PAK | T20 नंबर-1 फलंदाज बाबरची भुवनेश्वरने काढली हवा, पाहा VIDEO
- CM Eknath Shinde | सामान्यांचा रोजचा त्रास मुख्यमंत्र्यांनी काही वेळ भोगला! अन् घेतला ‘हा’ निर्णय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

