Share

Gujarat Election Results 2022 | गुजरात निकालांवर नितीन गडकरी यांची पहिली प्रतिक्रिया! म्हणाले…

Published On: 

Gujarat Election Results 2022 | नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. निकालांमध्ये भाजपने स्वतःचाच विक्रम मोडला आहे. भाजप 158, काँग्रेस 16, आप 5 आणि इतर 3 वर आघाडीवर आहेत. भाजपने शपथविधी सोहळ्याची तारीख देखील जाहीर केली आहे. 12 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता हा सोहळा होणार आहे. देशभरात भाजप कार्यकर्ते जल्लोष करत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या निकालावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

नितीन गडकरी म्हणाले, “गुजरातमध्ये भाजपचा मोठा विजय हा गुजरातच्या जनतेच्या भाजप आणि पंतप्रधान मोदींवरील अतूट विश्वास आणि आपुलकीचा विजय आहे. भाजपने गुजरातमध्ये जे विकासाचे राजकारण केले, त्यावर जनतेने पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केला आहे. या विश्वासाबद्दल गुजरातच्या जनतेचे लाख-लाख आभार. पंतप्रधान मोदी, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील आणि सर्व पक्ष कार्यकर्त्यांचे हार्दिक अभिनंदन.”

गुजरातमध्ये 182 विधानसभा जागांसाठी 1 डिसेंबर आणि 5 डिसेंबर रोजी दोन टप्प्यात मतदान झाले. गुजरातमध्ये पारंपारिक प्रतिस्पर्धी भाजप आणि काँग्रेस व्यतिरिक्त आम आदमी पक्षाच्या (आप) जोरदार उपस्थितीमुळे यावेळी निवडणूक लढत तिरंगी झाली.

गुजरातमध्ये 27 वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. यावेळी भाजप विक्रमी विजयासह सरकार स्थापन करणार असल्याचे दिसत आहे. 2002 च्या निवडणुकीत भाजपने गुजरातमध्ये 127 जागा जिंकल्या होत्या. दरम्यान हा आकडा 150 च्या जवळ पोहोचला आहे. 2002 मध्ये नरेंद्र मोदींनी दुसऱ्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती.

2017 च्या निवडणुकीबद्दल बोलायचे झाले तर एकूण 182 जागांपैकी भाजपने 99 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला 77 जागा मिळाल्या होत्या. गुजरातमध्ये आतापर्यंत भाजपने 2002 मध्ये सर्वाधिक 127 जागा जिंकल्या होत्या. आता भाजप 150 पेक्षा जास्त जागा जिंकू शकतो असा दावा केला जात आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!