Share

Ravi Rana | “महाराष्ट्रात सुद्धा भाजप सत्तेत येईल” ; रवी राणा यांचा विश्वास

Published On: 

Ravi Rana | अमरावती : गुजरात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. निकालांमध्ये भाजपने स्वतःचाच विक्रम मोडला आहे. भाजप 158, काँग्रेस 16, आप 5 आणि इतर 3 वर आघाडीवर आहेत. भाजपने शपथविधी सोहळ्याची तारीख देखील जाहीर केली आहे. 12 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता हा सोहळा होणार आहे. दरम्यान आमदार रवी राणा यांनी या निकालांवर प्रतिक्रिया दिली आहे.

“गुजरातमध्ये नरेंद्र मोदींचा करिष्मा आहे, नरेंद्र मोदींनी इतिहास घडवला, गुजरात देशाच्या विकासाचे उदाहरण आहे तर 2024 च्या लोकसभेत सुद्धा मोदी बाजी मारतील. तसेच मोदी, अमित शहा व देवेंद्र फडवणीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सुद्धा भाजपची सत्ता येईल. तर आघाडीत बिघाडी झाल्यामुळे भाजपचा झेंडा राज्यात फडकेल”, असा विश्वास रवी राणा यांनी व्यक्त केला.

गुजरातमध्ये 182 विधानसभा जागांसाठी 1 डिसेंबर आणि 5 डिसेंबर रोजी दोन टप्प्यात मतदान झाले. गुजरातमध्ये पारंपारिक प्रतिस्पर्धी भाजप आणि काँग्रेस व्यतिरिक्त आम आदमी पक्षाच्या (आप) जोरदार उपस्थितीमुळे यावेळी निवडणूक लढत तिरंगी झाली.

गुजरातमध्ये 27 वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. यावेळी भाजप विक्रमी विजयासह सरकार स्थापन करणार असल्याचे दिसत आहे. 2002 च्या निवडणुकीत भाजपने गुजरातमध्ये 127 जागा जिंकल्या होत्या. दरम्यान हा आकडा 150 च्या जवळ पोहोचला आहे. 2002 मध्ये नरेंद्र मोदींनी दुसऱ्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती.

2017 च्या निवडणुकीबद्दल बोलायचे झाले तर एकूण 182 जागांपैकी भाजपने 99 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला 77 जागा मिळाल्या होत्या. गुजरातमध्ये आतापर्यंत भाजपने 2002 मध्ये सर्वाधिक 127 जागा जिंकल्या होत्या. आता भाजप 150 पेक्षा जास्त जागा जिंकू शकतो असा दावा केला जात आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!