Share

Sushma Andhare | “मुलाने हजार कोटीचा आणलेला निधी कुठे गेला?”; सुषमा अंधारेंचा मुख्यमंत्र्यांना परखड सवाल 

Published On: 

🕒 1 min read

Sushma Andhare | मुंबई : शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) मागील काही दिवसांपासून ‘महाप्रबोधन यात्रे’च्या माध्यमातून महाराष्ट्र दौरा करत आहेत. महाप्रबोधन यात्रेनिमित्त नेत्या अंधारे कल्याण पूर्वेत आल्या होत्या. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर निशाणा साधलाय.

“माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या काळात विकास कामांसाठी निधी मिळत नाही म्हणून तणतण करत ३९ जण एकनाथ शिंदे यांच्या सोबत निघून गेले. आता किती, कोणाला निधी मिळाला? त्यातून काय कामे झाली?”, असे सवाल करत सुषमा अंधारे यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला.

“आपल्या मुलाच्या मतदारसंघात रस्ते कामांसाठी हजार कोटीचा निधी आला आहे. तरीही रस्ते का काचेसारखे गुळगुळीत?, असा खोचक सवाल करत शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांना टोला लगावला.

नेमकं काय म्हणाल्या सुषमा अंधारे? 

सुषमा अंधारे म्हणाल्या, “कल्याण मधील कार्यक्रमासाठी यायचे म्हणून लवकरच एका खासगी कार्यक्रमासाठी कल्याण परिसरातील नातेवाईकांकडे आले होते. येताना कल्याण, डोंबिवलीतील रस्त्यांची परिस्थिती पाहून या शहरासाठी ३६० कोटी, त्यानंतर एक हजार कोटीचा निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खा. शिंदे यांनी आणला. तो गेला कुठे असा प्रश्न पडला. कल्याण, डोंबिवलीतील काचे सारखे गुळगुळीत रस्ते पाहून आमचे वाहन रस्त्यावरुन घसरते की काय अशी भीती आम्हाला वाटत होती.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!