Share

Nana Patole | “गुजरातचा विजय लोकशाही पद्धतीने नाही”; नाना पटोले असं का म्हणाले?

Published On: 

🕒 1 min read

Nana Patole | मुंबई : गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल (Election Results )जसजसे स्पष्ट होत आहेत तसतशा राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. गुजरात निवडणुकांच्या निकालावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलीय.

लोकशाहीची हत्या करून मिळवलेला हा विजय असल्याचं नाना पटोले म्हणालेत. पुढे ते म्हणाले, “गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्जची आयात झाली. मुंद्रा पोर्टावर मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. तरुणांमध्ये व्यसनाधीनतेचं प्रमाण, भय, भ्रष्टाचार या सर्व गोष्टींचा गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर वापर झाला.”

हिमाचल प्रदेशमध्ये कोणीही भाजपचे नेते गेले तरी काहीही फरक पडणार नाही, तिथे कोंग्रेसचीच सत्ता येईल असा दावाही नाना पटोले यांनी यावेळी बोलताना केलाय. भाजपने केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून मिळवलेली सत्ता आहे असा आरोप नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे.

“जो निकाल आला त्याचं आम्ही स्वागत करतो. लोकशाहीत मतदानाच्या वेळी भय, भ्रष्टाचार आणि व्यसनाधिनता हे अपेक्षित नाही. आम्हाला गुजरातमध्ये ज्या कमी जागा मिळाल्या त्याचं आम्ही आत्मपरिक्षण करू. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस गुजरातमध्ये चांगली कामगिरी करेल,” असं मत नाना पटोले यांनी व्यक्त केलं.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!