Share

Gujarat Election Result | “राहुल गांधी देशाचे नेतृत्व होऊ शकत नाही” ; गुजरात निकालांवर बावनकुळेंची प्रतिक्रिया!

Published On: 

🕒 1 min read

Gujarat Election Result | गुजरातमध्ये विधानसभेच्या 182 जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. भाजप बहुमताच्या पुढे गेला असताना काँग्रेस आणि आम आदमी पक्षाची अवस्था बिकट आहे. 2017 च्या तुलनेत यावेळी दोन्ही टप्प्यात कमी मतदान झाले. पहिल्या टप्प्यात 60.20 टक्के लोकांनी मतदान केले होते, तर 5 डिसेंबर रोजी झालेल्या दुसऱ्या टप्प्यात 64.39 टक्के लोकांनी मतदानाचा हक्क बजावला होता. 1 वाजेपर्यंत गुजरातमध्ये भाजपने 154 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस 17 जागांवर आघाडीवर आहे. विक्रमी बहुमताकडे वाटचाल सुरु असल्यामुळे भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “गुजरातच्या इतिहासात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गुजरातच्या जनतेनी चांगला प्रतिसाद दिला आहे. गुजरातमध्ये ज्या पध्दतीने सरकारने काम केले आहे. त्यामुळे हा विजय मिळाला आहे. गुजरातच्या जनतेचे आभार. राहुल गांधी हे देशाचं नेतृत्वच होऊ शकत नाही. देशाचे नेतृत्व होण्याकरिता जीवन समर्पित करावे लागते.”

गुजरातमध्ये 27 वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. यावेळी भाजप विक्रमी विजयासह सरकार स्थापन करणार असल्याचे दिसत आहे. 2002 च्या निवडणुकीत भाजपने गुजरातमध्ये 127 जागा जिंकल्या होत्या. दरम्यान हा आकडा 150 च्या जवळ पोहोचला आहे. 2002 मध्ये नरेंद्र मोदींनी दुसऱ्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती.

2017 च्या निवडणुकीबद्दल बोलायचे झाले तर एकूण 182 जागांपैकी भाजपने 99 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला 77 जागा मिळाल्या होत्या. गुजरातमध्ये आतापर्यंत भाजपने 2002 मध्ये सर्वाधिक 127 जागा जिंकल्या होत्या. आता भाजप 150 पेक्षा जास्त जागा जिंकू शकतो असा दावा केला जात आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!