PAK vs ENG | मुलतान : सध्या पाकिस्तानमध्ये पाकिस्तान आणि इंग्लंड (PAK vs ENG) या संघांमध्ये तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. पाकिस्तानातील मुलतानच्या मैदानावर या मालिकेतील दुसरा सामना सुरू आहे. बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लंड संघाने शुक्रवारी पाकिस्तानविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इतिहास रचला आहे. इंग्लंड संघाने मैदानात उतरताच हा पराक्रम केला आहे. 2000 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा इंग्लंड हा संघ जागतिक क्रिकेट मधील पहिला संघ ठरला आहे.
पाकिस्तानातील मुलतानमध्ये पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यांमध्ये इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. या सामन्यांमध्ये इंग्लंड संघाची आक्रमक फलंदाजी सुरू आहे.
इंग्लंड संघाच्या आंतरराष्ट्रीय सामन्याबद्दल सांगायचे झाले तर, इंग्लंडने आतापर्यंत 1057 कसोटी, 773 वनडे आणि 170 टी-20 सामने खेळले आहेत. इंग्लंड संघाने आतापर्यंत सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहे. इंग्लंड पाठोपाठ या यादीमध्ये ऑस्ट्रेलियन संघाचे नाव आहे. ऑस्ट्रेलिया संघाने आतापर्यंत एकूण 1995 सामने खेळले आहे. तर या यादीत भारतीय संघ तिसऱ्या आणि पाकिस्तानी संघ चौथ्या क्रमांकावर आहे.
तीन सामन्याच्या या कसोटी मालिकेमध्ये इंग्लंड संघाने 1-0 ने आघाडी घेतली आहे. तर दुसरा सामना आजपासून सुरू झाला आहे. हा दुसरा सामना पाकिस्तानमधील मुलतानच्या क्रिकेट मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यासाठी इंग्लंड संघ मैदानापासून थोड्या अंतरावर असलेल्या एका हॉटेलमध्ये वास्तव्य करत आहे. त्या हॉटेल पासून एक किलोमीटर अंतरावर गुरुवारी गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, हा गोळीबाराचा प्रकार घडून आल्याने इंग्लंड संघाच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.
महत्वाच्या बातम्या
- Katrina Kaif & Vicky Koushal | विकी-कॅटच्या लग्नात का होते मर्यादित लोकं?, कतरिनाने दिले उत्तर म्हणाली…
- Sushma Andhare | “मुलाने हजार कोटीचा आणलेला निधी कुठे गेला?”; सुषमा अंधारेंचा मुख्यमंत्र्यांना परखड सवाल
- Sushma Andhare | आज ही गुजरातला निवडणुका जिंकण्यासाठी बाळासाहेबांचे नाव वापरावं लागत – सुषमा अंधारे
- Amol Mitkari | “…त्यामुळे देवेंद्र फडणवीस हेच खरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत”; अमोल मिटकरींचा एकनाथ शिंदेंना टोला
- Vitamin C | शरीरातील ‘विटामिन सी’ची कमतरता भरून काढायची असेल, तर आहारात ‘या’ गोष्टींचा करा समावेश


