Katrina Kaif & Vicky Koushal | मुंबई: बॉलीवूड सुपरस्टार विकी कौशल (Vicky Koushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) यांच्या लग्नाचा आज पहिला वाढदिवस आहे. 9 डिसेंबर 2021 रोजी कतरिना आणि विकी यांनी राजस्थानमध्ये लग्न गाठ बांधली होती. राजस्थानी येथील माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्टमध्ये त्यांचा विवाह सोहळा संपन्न झाला होता. त्यांच्या लग्न सोहळ्याला मोजकेच पाहुणे उपस्थित होते. लग्नानंतर विकी आणि कौशलने रिसेप्शन देखील केलं नव्हतं. बॉलीवूडमध्ये एकीकडे मोठे मोठे लग्न सोहळे आयोजित केले जात असताना विकी कौशल आणि कतरिना कैफने मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न केले होते. त्यांनी हा निर्णय का घेतला, असा प्रश्न अनेकांना पडला होता. कतरिनाने एका मुलाखतीमध्ये या मागच्या कारणाचा खुलासा केला आहे.
‘झूम’ला कतरिनाने मध्यंतरी एक मुलाखत दिली होती. या मुलाखती दरम्यान कतरिनाने सांगितले होते की,”विकी आणि मी आमचा लग्न सोहळा अगदी खाजगीत पार पाडायचा असा, निर्णय घेतला होता. कारण आमचे लग्न झाले तेव्हा कोरोनाचे संकट पूर्णपणे टळलेले नव्हते. आम्ही दोघेही कोरोनाच्या नियमांमुळे अधिक सावध होतो. कारण माझ्या कुटुंबातील काही जणांना करोनाची लागण झाली होती. त्यामुळे या गोष्टीचे गांभीर्य आम्हाला माहीत होते.”
या मुलाखतीमध्ये ती पुढे म्हणाली की,”2020 पेक्षा 2021 हे वर्ष थोडं चांगले होतं. पण तरीही आम्हाला आमच्या लग्नामध्ये प्रत्येक गोष्टीची बारकाईने काळजी घ्यावी लागली. म्हणून काही मोजक्याच लोकांना आमंत्रण देत त्यांच्या आशीर्वादाने आम्ही दोघांनी लग्न केले आहे. राजस्थानमध्ये आमचे लग्न व्यवस्थित पार पडला आणि आम्ही दोघे सध्या खूप खुश आहोत.”
विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पंजाबी पद्धतीने लग्न केले होते. त्यांच्या लग्न समारंभास बॉलीवूडमधील मर्यादित स्टार्स आमंत्रण देण्यात आले होते. त्याचबरोबर त्यांच्या लग्नामध्ये फक्त कुटुंबातील सदस्य आणि जवळची मित्रमंडळी उपस्थित होते. अशा पद्धतीने अत्यंत गुप्तपणे कोणतीही गोष्ट जाहीर न करता अगदी कडक नियम पाळून या दोघांचा विवाह सोहळा पार पडला होता.
- Sushma Andhare | आज ही गुजरातला निवडणुका जिंकण्यासाठी बाळासाहेबांचे नाव वापरावं लागत – सुषमा अंधारे
- Amol Mitkari | “…त्यामुळे देवेंद्र फडणवीस हेच खरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत”; अमोल मिटकरींचा एकनाथ शिंदेंना टोला
- Vitamin C | शरीरातील ‘विटामिन सी’ची कमतरता भरून काढायची असेल, तर आहारात ‘या’ गोष्टींचा करा समावेश
- IND vs BAN | तिसऱ्या वनडेसाठी के. एल. राहुल करणार टीम इंडियाचे नेतृत्व, तर ‘हे’ गोलंदाज संघातून बाहेर
- Uddhav Thackeray | “मोदी हे गुजरातचे गौरव पुरुष”; ठाकरे गटाकडून कौतुकाचा वर्षाव
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

