Share

Nitesh Rane | “…तर ते परत घरी जाणार नाहीत”; पुण्यातील ‘त्या’ घोषणेबाजीनंतर नितेश राणेंचा इशारा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई :  काल पुण्यामध्ये ‘पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया’ या संघटनेवरील छापेमारीविरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी ‘पाकिस्तान जिंदाबाद’ आणि ‘अल्लाह हूं अकबर’ अशा धक्कादायक घोषणा देण्यात आल्या. याप्रकारामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. अशातच या सगळ्याप्रकारावर भाजप पक्षाचे नेते नितेश राणे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

काय म्हणाले नितेश राणे ?

यापुढे कोणी ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे लावले, तर ते परत घरी जाणार नाहीत, असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे. नितेश राणे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

देश द्रोह्यांना तात्काळ अटक करून कडक शिक्षा द्यावी –

हे लोक आता विसरले असतील की महाराष्ट्रात हिंदुत्ववादी सरकार आहे. पीएफआयच्या समर्थनात काही नालायकानी पाकिस्तान जिंदाबादचे नारे पुण्यात दिले. देशाच्या विरुद्ध कोणी असे नारे देत असेल तर अशा देश द्रोह्यांना शिक्षा झाली पाहिजे. पुढे बोलताना राणे म्हणाले, राज्यातील हिंदूत्ववादी सरकारने या लोकांवर कारवाई करावी या लोकांना तात्काळ अटक करून कडक शिक्षा द्यावी.

दरम्यान, आंदोलनावेळी मुस्लीम समुदायामधील काही व्यक्तींनी पाकिस्तानच्या समर्थनार्थ नारेबाजी केली. आंदोलकांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात ‘आरएसएस मुर्दाबाद’ अशीही घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीनंतर पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच, यासगळ्या घोषणाबाजीचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.
महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!